Full Width(True/False)

रिचार्जसाठी पैसे नाहीत? Jio मोफत देत आहे ५ जीबी डेटा, असा घ्या 'या' सुविधेचा लाभ

नवी दिल्ली : एकमेकांना टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या शानदार लाँच करत आहे. डेटा, कॉलिंगसह आता यूजर्सला ओटीटी सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळत आहे. रिलायन्स देखील ग्राहकांसाठी कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणारे प्लान्स आणत आहे. कंपनीने केवळ नियमित प्लान्सच नाही तर इमर्जेंसी प्लान देखील सादर केला होता. या प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: जिओचे इमर्जेंसी या प्लान अंतर्गत तुम्ही डेटा रिचार्ज करू शकता व यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. तुमच्याकडे रिचार्जसाठी पैसे नसल्यास हा प्लान खूपच उपयोगी येईल. तुम्हाला डेटा लोन घेताना पैसे द्यावे लागणार नाहीत. मात्र, नंतर पैसे द्यावे लागतील. जिओ यूजर्स कंपनीच्या अधिकृत अ‍ॅपद्वारे प्लान निवडू शकतात व १ जीबी फ्री डेटा मिळेल. यासाठी त्वरित कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही. यूजर्स १ जीबी डेटाचे ५ प्लान्सचे रिचार्ज करू शकतात. या सुविधेद्वारे यूजर्स आपल्या गरजेनुसार रिचार्ज करू शकतील व नंतर पैसे देता येतील. १ जीबी डेटासाठी यूजर्सला ११ रुपये द्यावे लागतील. तसेच, ५ जीबी डेटासाठी ५५ रुपये लागतील. या रिचार्जचे पैसे कधीही देता येईल. कंपनीने यासाठी ठराविक मुदत दिलेली नाही. अशाप्रकारे घ्या Emergency Data Loan चा फायदा यासाठी सर्वात प्रथम जिओ अ‍ॅपवर जा. आता तुम्हाला स्क्रीनच्या डाव्याबाजूला एक मेन्यू दिसेल. यावर क्लिक करून मोबाइल सर्व्हिसेजमध्ये ‘Emergency Data Loan’ यावर टॅप करा. आता Proceed वर क्लिक करून Get Emergency Loan वर टॅप करा. आता तुमचा प्लान अ‍ॅक्टिव्हेट होईल. तुम्ही एकाचवेळी ५ प्लान्सचा फायदा घेऊ शकता. याची वैधता तुमच्या नियमित प्लान एवढी असेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bNHFkX