Full Width(True/False)

५० MP AI ट्रिपल कॅमेरासह Oppo A54s स्मार्टफोन लाँच, किंमत बजेटमध्येच, पाहा फीचर्स

नवी दिल्ली : Oppo ने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला असून या स्मार्टफोनमध्ये ६० Hz रिफ्रेश रेटसह ६.५२ इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. Oppo A54s AI सपोर्टेड ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेल आहे. हे डिव्हाइस सध्या यूकेमध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचा: Oppo A54s ची किंमत आणि उपलब्धता : Oppo A54s ची किंमत कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. हे Amazon इटलीच्या साइटवर EUR २२९.९९ (अंदाजे रु.२०,०००) मध्ये लिस्ट आहे. ही किंमत त्याच्या फक्त ४GB रॅम आणि १२८ GB स्टोरेजसाठी आहे. हा फोन १८ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार असून फोन क्रिस्टल ब्लॅक आणि पर्ल ब्लू रंगांमध्ये विकण्यात येईल. स्मार्टफोनची जागतिक किंमत अद्याप उघड करण्यात आलेली नाही. Oppo A54s चे स्पेसिफिकेशन्स : ड्युअल सिम रनिंग वर आधारित ColorOS ११.१ वर काम करेल. यात ६० Hz रिफ्रेश रेटसह ६.६२ -इंच HD+ स्क्रीन आहे. या फोनमध्ये Octa core MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर,Oppo A54s च्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेल आहे. याशिवाय २ मेगापिक्सलचा मोनो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. समोर, सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ब्लूटूथ v5, GPS/A-GPS, 4G, Wi-Fi, USB Type-C पोर्ट आणि ३.५ mm हेडफोन जॅक आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याशिवाय फोनमध्ये सुरक्षेसाठी फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर Oppo A54s मध्ये ५,००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. लिस्टनुसार, हा फोन १० W मानक चार्जिंगला सपोर्ट करतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mwFPez