Full Width(True/False)

OnePlus Nord 2 Pac Man Edition: मीडियाटेक डायमेन्सिटी 1200 SoC प्रोसेसर असेल प्रमुख आकर्षण, लॉंचिंग लवकरच

नवी दिल्ली: OnePlus ने एका टीझरद्वारे नवीन Pac-Man Edition लाँचची माहिती दिली आहे .या टीझरमध्ये प्रॉडक्ट समोर "coming soon" असे लिहिले आहे. OnePlus Nord 2 Pac-Man Edition कोणत्या दिवशी लाँच होईल याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही. पाहा डिटेल्स. वाचा: लीकनुसार, OnePlus कंपनी Nord 2 चे Pac-Man एडिशन लाँच करण्यावर काम करत आहे. एका वेगळ्या लीकनुसार, हा फोन स्नॅपड्रॅगन 778G SoC ऐवजी MediaTek Dimensity 1200 SoC प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. हा प्रोसेसर परवडणाऱ्या फ्लॅगशिप किंवा प्रीमियम मिड-बजेट स्मार्टफोन्ससाठी डिझाइन करण्यात आला असून MediaTek Dimensity 1200 ने Geekbench CPU बेंचमार्कमध्ये तुलनेने हाय स्कोर मिळवला आहे. स्नॅपड्रॅगन 778G देखील खूप पॉवरफुल आहे. हा एक ६ nm चिपसेट आहे . OnePlus Nord 2 भारतीय किंमत: OnePlus Nord 2 Pac-Man Edition ची किंमत काय असेल याबद्दल माहिती अद्याप उपलब्ध नाही. परंतु, OnePlus Nord 2 च्या किंमतीचा थोडासा अंदाज लावला जाऊ शकतो. त्याची किंमत २७,९९९ रुपयांपासून सुरू होते. डिव्हाइस ब्लू हेज, ग्रे सिएरा आणि ग्रीन वुड्स रंगांमध्ये येते. फोनचा Pac-Man एडिशन हा एक खास प्रकार असेल आणि तोही वेगळ्या चिपसेटसह. त्याची किंमत OnePlus Nord 2 पेक्षा थोडी वेगळी असू शकते. त्या तुलनेत किंमत थोडी कमी असेल असे मानले जात आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus Nord 2 Pac-Man Edition मधील चिपसेट व्यतिरिक्त काय वेगळे असेल हे सध्या स्पष्ट नाही. मात्र आणखी काही बदल पाहायला मिळू शकतात, असे सांगण्यात येत आहे. कंपनी स्पेशल एडिशन स्मार्टफोन रिलीज करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला देखील कंपनीने MacLaren Edition लाँच केले होते. त्याच वेळी, अलीकडेच, कंपनीने भारतात हॅरी पॉटर एडिशन वनप्लस वॉच देखील लाँच केला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mReNPi