Full Width(True/False)

५ हजारांच्या बजेटमध्ये मिळतायत 'हे' २ स्मार्टफोन्स, त्वरित करा खरेदी; अन्यथा हातातून जाईल संधी

नवी दिल्ली : तुम्ही जर ५ हजारांच्या बजेटमध्ये येणारा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. ५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या अशाच दोन शानदार फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: I KALL K260 (2GB, 16GB) I KALL K260 स्मार्टफोनच्या किंमत ४,४९९ रुपये आहे. या फोनमध्ये रियरला ८ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. याशिवाय फोनमध्ये ६.२६ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ५४०x११४० पिक्सल आहे. यात २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला ६४ जीबीपर्यंत वाढवू शकता. यात ड्यूल सिमचा (४जी+२जी) सपोर्ट मिळतो. यात १.३ गीगाहर्ट्ज क्वाड कोर प्रोसेसरसह अँड्राइड ६.० मार्शमेलो ओएस मिळतो. कंपनीने डिव्हाइसवर १ वर्षाची आणि बॉक्स एक्सेसरीजवर ६ महिन्यांची वॉरंटी दिली आहे. iSmart Bold 4G Volte स्मार्टफोनच्या २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेजला ४,८०० रुपयात खरेदी करू शकता. यात ५.५ इंच फुल स्क्रीन डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १९८०x१०८० पिक्सल आहे. यात २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजल मायक्रोएसडी कार्डने वाढवू शकता. यात रियरला ५ मेगापिक्सल आणि फ्रंटला २ मेगापिक्सल कॅमेरा मिळतो यात फास्ट चार्जिंग सपोर्टसह ३००० एमएएच रिमूव्हेबल ली-पॉलिमर बॅटरी दिली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर शानदार डीलसह उपलब्ध आहे. फेस्टिव्ह सीझननंतर देखील फोन्सला स्वस्तात खरेदीची संधी आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mRePqo