नवी दिल्लीः ला रशियात लाँच करण्यात आले आहे. फोन सॅमसंग गॅलेक्सी ए २२ ५ जी चा रिबॅज मॉडल आहे. याला जुलै मध्ये भारतात लाँच करण्यात आले होते. Samsung Galaxy A22s 5G ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत आला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा मेन सेन्सर दिला आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. हा मीडियाटेक डायमेशन 700 SoC प्रोसेसर सोबत येतो. सॅमसंग गॅलेक्सी ए २२ एस ५ जी मध्ये ६.६ इंचाचा टीएफटी एलसीडी डिस्प्ले दिला आहे. यात ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. Samsung Galaxy A22s 5G ची किंमत नवीन सॅमसंग गॅलेक्सी ए २२ एस ५ जी ची किंमत आणि उपलब्धतेची घोषणा करण्यात आली नाही. फोनला मिंट, ग्रे आणि व्हाइट कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आले आहे. हा दोन कॉन्फिगरेशन 4GB RAM + 64GB स्टोरेज आणि 4GB RAM + 128GB स्टोरेज ऑप्शन मध्ये येतो. Samsung Galaxy A22s 5G चे स्पेसिफिकेशंस Galaxy A22s 5G अँड्रॉयड आधारित वन यूआय वर चालतो. त्यात ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस टीएफटी एलसीडी डिस्प्ले दिला आहे. ज्यात वॉटरड्रॉप स्टाइल नॉच आणि ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट दिला आहे. मीडियाटेक डायमेंशन 700 SoC प्रोसेसर दिले आहे. ज्याला ४ जीबी रॅम सोबत जोडले आहे. इंटरनल स्टोरेज ६४ जीबी आणि १२८ जीबी पर्याय सोबत येते. ज्यात एक मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला आहे. Samsung Galaxy A22s 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा मेन सेन्सर सोबत ५ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि तिसरा २ मेगापिक्सलचा सेन्सरचा समावेश आहे. फोनच्या फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा फीचर्स मध्ये एचडी रिझॉल्यूशन सोबत 10x डिजिटल झूम आणि 120fps स्लो मोशन व्हिडिओचा समावेश आहे. Samsung Galaxy A22s 5G मध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी यूसबी टाइप सी पोर्ट, ३.५ मिमी ऑडियो जॅक, वाय फाय डायरेक्ट, एनएफसी आणि ब्लूटूथ व्ही ५.० चा समावेश आहे. तसेच साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. वाचाः वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kgkmVT