Full Width(True/False)

Affordable Plans :Jio च्या 'या' सर्वात स्वस्त प्रीपेड प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि २ GB डेटा, पाहा किंमत

नवी दिल्ली : टॅरिफ प्लानच्या किमती वाढल्या असल्यामुळे युजर्सच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे. Jio ने देखील आपले प्रीपेड प्लान महाग केले आहेत. नवे दर लागू झाले असून Jio चे प्रीपेड प्लान Airtel आणि Vi च्या तुलनेत थोडे स्वस्त आहेत. महत्वाचे म्हणजे कंपनी अनेक प्रकारचे प्रीपेड प्लान ऑफर करते. पाहा डिटेल्स. वाचा: Jio चा १५५ रुपयांचा प्लान: Jio चा असाच एक प्रीपेड प्लान १५५ रुपयांचा असून हा एक परवडणारा प्लान आहे. यात डेटा आणि अनलिमिटेड कॉल यांसारखे फायदे मिळतात. यामध्ये, Jio च्या अॅप्स जसे की Jio Cinema, Jio TV, Jio Cloud आणि Jio सिक्युरिटीचा अॅक्सेस देखील दिला जातो. हा प्लान Airtel आणि Vi च्या १७९ रुपयांच्या प्रीपेड प्लानपेक्षा स्वस्त आहे. Jio च्या सर्वात स्वस्त मासिक रिचार्ज प्लानची किंमत १५५ रुपये आहे. प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या वैधतेदरम्यान, ते कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल, ३०० मेसेजेस आणि एकूण २ GB हाय-स्पीड डेटा ऑफर करते. डेटा संपल्यानंतर, स्पीड ६४ kbps पर्यंत कमी केला जातो. Jio Cinema, Jio TV आणि इतरांनाही या प्लॅनमध्ये प्रवेश मिळतो. जर तुम्हाला मर्यादित डेटाबद्दल काळजी वाटत असेल तर तुम्ही डेटा अॅड-ऑन व्हाउचर घेऊ शकता. जिओच्या वेबसाइटवर त्याची किंमत १५ रुपयांपासून सुरू होते. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तुम्ही ते रिचार्ज करू शकता. एका अहवालानुसार, सप्टेंबर महिन्यात जिओचे ग्राहक कमी झाले आहेत. ट्रायच्या म्हणण्यानुसार, जिओने सप्टेंबर महिन्यात १९ दशलक्ष ग्राहक गमावले असून टेलिकॉम ऑपरेटर एअरटेलला याचा खूप फायदा झाला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yaWn03