Full Width(True/False)

Apple: आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत iPhone 12 Pro ला खरेदीची संधी, मिळतेय २१ हजार रुपये सूट

नवी दिल्ली : अ‍ॅपलने काही दिवसांपूर्वीच सीरिजला लाँच केले आहे. या सीरिजमधील फोन्सला भारतात ठीकठाक प्रतिसाद मिळत आहे. आयफोन १३ च्या लाँचिंगनंतर देखील भारतात iPhone 12 ची देखील चांगली विक्री होत आहे. तुम्ही जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. वाचा: iPhone 12 Pro वर २१ हजार रुपयांपर्यंत सूट iPhone 12 Pro फोन अ‍ॅमेझॉनवर बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. फोनच्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला २१ हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. आयफोन १२ प्रो च्या १२८ जीबी पेसिफिक ब्लू व्हेरिएंटची किंमत १,१९,९०० रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर वरून ९८,९०० रुपयात खरेदी करू शकता. यावर १४,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील आहे. तुम्ही २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेज मॉडेल देखील डिस्काउंटसह खरेदी करू शकता. २५६ जीबी व्हेरिएंट २७ हजार रुपये डिस्काउंटसह १,०२,९०० रुपये आणि ५१२ जीबी मॉडेल ४२,००० रुपये डिसकाउंटसह १,०७,९०० रुपयात उपलब्ध आहे. iPhone 12 Pro सह AirPods Pro ला १,१५,३९५ रुपयात खरेदी करू शकता. या ऑफर अंतर्गत तुमची २८,९१० रुपयांची बचत होईल. iPhone 12 Pro चे स्पेसिफिकेशन या फोनमध्ये एक नॅनो आणि एक ई-सिम सपोर्ट मिळतो. यात ए-१४ बायोनिक प्रोसेसर मिळेल. तसेच, सुपर रेटिनो एक्सडीआर ओलेड डिस्प्लेसह सेरेमिक शिल्ड ग्लास प्रोटेक्शन दिले आहे. फोनमध्ये ६.१ इंच डिस्प्ले मिळतो. iPhone 12 Pro मध्ये १२ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. कॅमेऱ्यासोबत LiDAR सपोर्ट दिला आहे. याद्वारे लो लाइट आणि नाइटला शानदार फोटोग्राफी करू शकता. तसेच, ४एक्स ऑप्टिकल झूम सपोर्ट मिळतो. फोनमध्ये १२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xRytXd