Full Width(True/False)

'बॅन लिपस्टीक' ट्रेंडवर तेजस्विनी- सोनालीने शेअर केले Video

मुंबई: सोशल मीडियावर अनेक गोष्टीं ट्रेंडमध्ये असतात. काही गोष्टींचे हॅशटॅग वापरून तो सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. सध्या सोशल मीडियावर 'बॅन लिपस्टिक' हा हॅशटॅग चांगलाच प्रचलित झाला आहे. विशेष म्हणजे हा हॅशटॅग वापरत मराठीमधील काही आघाडीच्या अभिनेत्रींनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामुळे हा हॅशटॅग कशासाठी आहे, असा प्रश्न सोशल मीडिया युझर्सना पडला आहे. अनेकांनी थेट यात सहभागी झालेल्या अभिनेत्रींना प्रश्न विचारला आहे. #बॅनलिपस्टिक हॅशटॅग झालाय प्रचलित मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री ने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करताना तेजस्विनीने #बॅनलिपस्टिक हा हॅशटॅग वापरला आहे. 'मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही. बॅनलिपस्टिक' असे म्हणत तेजस्विनीने लिपस्टिक पुसून टाकली. अशाच प्रकारचा व्हिडिओ अभिनेत्री नेदेखील तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने देखील #बॅनलिपस्टिक हॅशटॅग वापरला आहे. शिवाय तिने या व्हिडिओमध्ये तेजस्विनी पंडित ला टॅग केले आहे. युझर्सच्या भन्नाट कमेन्ट दरम्यान, तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे यांनी #बॅनलिपस्टिक हॅशटॅग वापरत जे व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यावर दिग्दर्शक संजय जाधव यांनी 'नेमकं काय झालं' अशी कमेन्ट केली आहे. तर अनेक युझर्सने त्यांना हाच प्रश्न विचारला. काहींनी दोघी आगामी सिनेमा अथवा वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी हा फंडा वापरत असल्याचं कमेन्टमध्ये नमूद केलं. काही युझर्सनी तर 'मास्कच्या आतमध्ये लिपस्टिक लावली काय न लावली काय... काय फरक पडतो...' अशा भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. एकूणच #बॅनलिपस्टिक हा हॅशटॅग कशासाठी वापरला जातो आहे, याबाबत युझर्समध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच या मागचं खरं कारण समोर येईल अशी अपेक्षा देखील युझर्स व्यक्त करत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ooPOmY