Full Width(True/False)

Cyber Attack: या कंपनींच्या Wi-Fi राउटरवर हॅकिंगचे संकट, तुमच्याकडे तर नाही यापैकी एक, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात सायबर अटॅकचे प्रमाण खूप वाढले आहे. स्मार्टफोन, छुपे अॅप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून, हॅकर्स बँक तपशील सहजपणे चोरू शकतात. गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांमुळे लोकांचे खूप नुकसान झाले आहे आणि त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशात माहिती समोर आली आहे की, हॅकर्स लोकांच्या घरात बसवण्यात आलेल्या वायफाय राउटरच्या माध्यमातून लोकांचा डेटा हॅक करत आहेत. वाचा: या कंपन्यांच्या वायफाय राउटरला धोका : नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, wifi च्या अनेक टॉप कंपन्यांचे राउटर धोक्यात आहेत आणि या राउटर्सच्या सहाय्याने हॅकर्स सहजपणे नेटवर्कमध्ये शिरून यूजरचा डेटा चोरू शकतात. अशात D-Link, Asus, Netgear, AVM, TP-Link, Synology आणि Edimax या कंपन्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. अहवालानुसार, या कंपन्या त्यांच्या राउटरमध्ये वापरत असलेले घटक खूप जुन्या आवृत्तीचे आहेत, ज्यामुळे हॅकर्ससाठी या राउटरच्या सेवांचा भंग करणे खूप सोपे आहे. टाळण्यासाठी हे करा: अहवालात असेही समोर आले आहे की, यापैकी बहुतेक कंपन्या अतिशय साधे पासवर्ड वापरतात. 'अॅडमिन' आणि '१२३४ ' सारखे पासवर्ड इतके सामान्य आणि अंदाज लावायला सोपे आहेत की हॅकर्स त्यांचा सहज अंदाज लावू शकतात. कंपन्याच हे पासवर्ड फक्त टाकत नाहीत, युजर्सही हे पासवर्ड वापरतात. म्हणून, सर्वप्रथम, तुमच्या वायफाय राउटरचा पासवर्ड बदला आणि सहज ओळखता येणार नाही असा पासवर्ड सेट करा. अहवाल प्रसिद्ध होताच या कंपन्यांना याबद्दल माहिती देण्यात आली, यापैकी Asus, D-Link आणि Netgear त्यांच्या राउटर मॉडेल्ससाठी एक फिक्स घेऊन आले आहे. जे, युजर्स इंस्टॉल करण्यासाठी वापरू शकतात. वायफाय राउटर फर्मवेअर, तुम्ही हे अपडेट करून करू शकता. हा अहवाल IoT Inspector आणि CHIP मॅगझिनच्या सुरक्षा संशोधकांच्या टीमने तयार केला असून त्यानुसार मोठ्या ब्रँड्सच्या हजारो वायफाय राउटरमध्ये सुमारे २२६ सुरक्षा समस्या आढळल्या आहेत. त्यातील सर्वच तितके धोकादायक नाहीत परंतु हॅकर्ससाठी गोष्टी निश्चितपणे सुलभ करतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Duh208