मुंबई- छोट्या पडद्यावरील कार्यक्रम '' चा टीआरपी पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. मागील सीजनमधील सदस्यांना या सीजनमध्ये वाइल्ड कार्ड आणण्याचा निर्मात्यांचा निर्णय योग्य ठरताना दिसतोय. सध्या घरात दोन गट पडले आहेत. जिथे , आणि उमर रियाज एका गटात आहेत तिथे सतत त्यांच्या विरुद्ध खेळताना दिसतोय. प्रतीकचा खेळ आतापर्यंत अनेक प्रेक्षकांना पसंत पडला आहे. प्रतीकची खेळण्याची पद्धत बिग बॉसच्या आधीच्या सीजनमधील सदस्यांना देखील पसंत पडत आहे. मात्र या आठवड्यात रंगलेल्या टास्कमध्ये तेजस्वीने प्रतीकवर काही गंभीर आरोप केले आहेत. या आठवड्यात खेळल्या जाणाऱ्या टास्कदरम्यान प्रतीक आणि करण यांच्यात जोरदार भांडण होतं. प्रतीक करणला तू मला जाणून बुजून लाथ मारल्याचं म्हणतो तर करण त्याला चुकून लागल्याचं सांगत वारंवार समजावताना दिसतो. परंतु, प्रतीक ऐकण्यास तयार नसतो. त्यामुळे तेजस्वी मध्ये पडत प्रतीकवर गंभीर आरोप करते. तेजस्वी म्हणते, 'टास्क खेळताना तुझा हात मुलींना कुठे कुठे लागतो ते सांगू का? तू मुद्दाम मुलींना चुकीच्या ठिकाणी हात लावतो असं म्हणू का मी? इतकं म्हणताच रश्मी देसाई तेजस्वीला शांत करताना दिसते. परंतु, तेजस्वीच्या अशा वागण्यावर घरातले तिच्यावर रागावलेले दिसतात. तेजस्वीचा चांगला मित्र असलेला निशांत भट्ट देखील यावेळेस तिच्यावर रागावलेला दिसतो. निशांत तेजस्वीला म्हणतो, 'अशा वेळेस जुन्या गोष्टी मुद्दाम मध्ये आणण्याची गरज नाही.' तेजस्वीचा मित्र उमर रियाज देखील याबाबतीत तिच्या विरोधात असलेला पाहायला मिळाला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ptR6wi