Full Width(True/False)

मलायका अरोराच्या उलट- सुलट योगाभ्यासावार नेटकरी फिदा

मुंबई- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मलायका तिचे हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. मलायका मॉडेलिंगसोबतच फिटनेस फ्रिक देखील आहे. स्वतःच्या फिटनेसबाबत मलायका प्रचंड जागरूक आहे. त्यामुळेच मलायका तिचे व्यायाम करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मलयकाच्या फोटोंना भरभरून प्रतिसाद मिळत असतो. परंतु, आता मलायकाने शेअर केलेला व्हिडिओ पाहून नेटकरी पुन्हा एकदा तिच्यावर फिदा झाले आहेत. मलयकाने तिचा योगा करतानाचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. प्रत्येक सोमवारी मलायका एक व्हिडिओ शेअर करत असते. या सोमवारी मलायकाने 'उत्कटासन' करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. परंतु, हे आसन मलायकाने 'रॉक अँड रोल' सोबत जोडलं आहे. व्हिडिओत मलायका शॉर्ट पॅण्ट आणि स्पोर्ट्स ब्रा मध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत मलायकाने लिहिलं, 'तुम्ही एका चॅलेन्जसाठी तयार आहात का? उत्कटासन सोबत रॉक अँड रोल एक गंमतीशीर अनुभव आहे.' मलायकाला पाहून अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिलं, 'तू पुन्हा एकदा सिद्ध केलं की वय हा फक्त एक नंबर आहे.' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'बापरे तुझी एनर्जी खूप अप्रतिम आहे.' आणखी एका युझरने लिहिलं, 'तू नक्की काय खातेस?' मलायकाच्या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सोबतच मलायका अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सध्या मलायका 'इंडियाज बेस्ट डान्सर २' मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसतेय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dkQF1W