Full Width(True/False)

Moto G51 5G: १० डिसेंबरला भारतात एंट्री करू शकतो Motorola चा शानदार स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : Motorola च्या आगामी स्मार्टफोन ची लाँच तारीख लीक झाली असून टेक टिपस्टर शर्मा यांच्या मते, हे डिव्हाइस भारतीय बाजारात १० डिसेंबर रोजी सादर केले जाईल. हे कंपनीचे पहिले Device असेल, जे Qualcomm च्या Snapdragon 480 Plus चिपसेट सह भारतीय बाजारात लाँच केले जाऊ शकते . इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, युजर्सना आगामी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ८ GB RAM मिळू शकते. वाचा: Moto G51 ची अपेक्षित किंमत: Moto G 51 स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण असा अंदाज वर्तविण्यात येत आहे की, या Smartphone ची किंमत जवळपास १९,९९९ रुपये असू शकते. डिव्हाइस जी सीरीजचा सर्वात स्वस्त फोन असेल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने परवडणारा 5G फोन Moto G जागतिक बाजारात लाँच केला होता. Moto G51 चे स्पेसिफिकेशन्स: Moto G51 स्मार्टफोनमध्ये १२० Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.८ इंचाचा पंच-होल LCD डिस्प्ले असेल. यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ४८०+ प्रोसेसर, ८ GB रॅम आणि १२८ GB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, Moto G51 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्याचा प्राथमिक सेन्सर ५० MP असेल. तर यामध्ये ८MP आणि २ MP लेन्स देण्यात येणार आहेत. याशिवाय हा फोन १३ MP सेल्फी कॅमेराने सुसज्ज असू शकतो. Moto G51 बॅटरी : Moto G51 स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी १० W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज असेल. त्यात डॉल्बी अॅटमॉस दिला जाऊ शकतो. याशिवाय आगामी स्मार्टफोनमध्ये 5G, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB Type-C पोर्ट सारखे फीचर्स मिळू शकतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3psBUQ5