भारतीय बाजारात आज स्मार्टफोन सेगमेंट सर्वात मोठे आहे. ग्राहकांची मागणी पाहता कंपन्या दर आठवड्याला नवनवीन फोन्स सादर करत असतात. अनेकजण आता फीचर फोनमधून अपग्रेड करत स्मार्टफोन्सकडे वळताना दिसत आहे. मात्र, असे असले तरीही भारतातील बहुतांश लोक आजही फीचर फोनचा वापर करतात. फीचर फोनचा वापर करण्यामागे याची किंमत कमी असणे व टिकाऊ हे दोन प्रमुख कारणे देखील आहेत. भारतात १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे अनेक शानदार फीचर फोन्स उपलब्ध आहेत. स्मार्टफोनच्या तुलनेत हे फोन्स अधिक काळ टिकतात व यांची बॅटरी देखील लवकर समाप्त होत नाही. १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही Itel it2173, Lava A1, Itel it2163, Karbonn KX10i, TYMES Y5000, Kechao K66, InFocus Hero 1, I Kall K38 Flip आणि Lava A1 Josh सारखे स्मार्टफोन्स खरेदी करू शकता.

Best phones: १ वर्षाच्या रिचार्जपेक्षाही कमी किंमतीत येतात हे टॉप-५ फोन्स, सेकेंडरी डिव्हाइस म्हणून करू शकता वापर

भारतीय बाजारात आज स्मार्टफोन सेगमेंट सर्वात मोठे आहे. ग्राहकांची मागणी पाहता कंपन्या दर आठवड्याला नवनवीन फोन्स सादर करत असतात. अनेकजण आता फीचर फोनमधून अपग्रेड करत स्मार्टफोन्सकडे वळताना दिसत आहे. मात्र, असे असले तरीही भारतातील बहुतांश लोक आजही फीचर फोनचा वापर करतात. फीचर फोनचा वापर करण्यामागे याची किंमत कमी असणे व टिकाऊ हे दोन प्रमुख कारणे देखील आहेत. भारतात १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे अनेक शानदार फीचर फोन्स उपलब्ध आहेत. स्मार्टफोनच्या तुलनेत हे फोन्स अधिक काळ टिकतात व यांची बॅटरी देखील लवकर समाप्त होत नाही. १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही Itel it2173, Lava A1, Itel it2163, Karbonn KX10i, TYMES Y5000, Kechao K66, InFocus Hero 1, I Kall K38 Flip आणि Lava A1 Josh सारखे स्मार्टफोन्स खरेदी करू शकता.

Itel it2173
Itel it2173

किंमतीबद्दल सांगायचे तर Itel it2173 ची सुरुवाती किंमत फक्त ९४९ रुपये आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर Itel it2173 फीचर फोनमध्ये १.८ इंच टीएफटी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १२८x१६० पिक्सल आहे. या फोनमध्ये १००० एमएएचची बॅटरी दिली आहे, जी सिंगल चार्जमध्ये अनेक तास टिकते. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ०.३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. यात ड्यूल सिम कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट दिला आहे.

Lava A1
Lava A1

किंमतीबद्दल सांगायचे तर Lava A1 फीचर फोनला तुम्ही फक्त ९३९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. फीचर्सबद्दल सांगायचे तर Lava A1 मध्ये १.८ इंच डिस्प्ले दिला आहे. तर पॉवरसाठी यात ८०० एमएएचची बॅटरी मिळते. फोटोग्राफीसाठी यात ०.३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ सपोर्ट दिला आहे. फोन ड्यूल सिम सपोर्टसह येतो. Lava A1 ला तुम्ही Green, Midnight Black , Ivory White, Light Blue आणि Magenta Red रंगात खरेदी करू शकता.

Karbonn KX10i
Karbonn KX10i

Karbonn KX10i फीचर फोनची सुरुवाती किंमत ८७० रुपये आहे. या शानदार फीचर फोनमध्ये १.८ इंच डिस्प्ले दिला आहे. तर पॉवरसाठी ८०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. यात ३२ एमबी रॅम आणि ३२ एमबी स्टोरेज दिले आहे. तसेच, मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबी पर्यंत स्टोरेजला वाढवू देखील शकता. Karbonn KX10i या फीचर फोनमध्ये ड्यूल सिम कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट दिला आहे.

InFocus Hero 1
InFocus Hero 1

InFocus Hero 1 या फीचर फोनला तुम्ही ८१० रुपयांच्या सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. या फोनमध्ये १.७७ इंच डिस्प्ले दिला आहे. तर पॉवरसाठी ८०० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. यात ०.३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि सिंगल सिम कनेक्टिव्हिटी दिली आहे.

I Kall K38 Flip

I Kall K38 Flip फीचर फोन ८९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फोनमध्ये १.८ इंच डिस्प्ले दिला आहे. तर पॉवरसाठी ८०० एमएएचची बॅटरी मिळते. रियरला ०.३ मेगापिक्सल कॅमेरा मिळतो. फोन सिंगल सिम कनेक्टिव्हिटीसह येतो.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rxNQmi