Full Width(True/False)

Black Hornet Nano: हातात पकडू शकता ‘हे’ खास हेलिकॉप्टर, काम मात्र मोठमोठे; किंमत कोट्यावधी रुपये

नवी दिल्ली : जगभरात एकापेक्षा एक शानदार हेलिकॉप्टर्स आहेत, ज्यांचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. यांची किंमत देखील कोट्यावधी रुपये असून, सर्वसामान्य व्यक्ती खरेदीही करू शकत नाही. या हेलिकॉप्टर्सचा आकार एखाद्या मोठ्या ट्रक एवढा असतो. मात्र, असे एक देखील आहे, ज्याला सहज तुम्ही हातात पकडू शकता. मात्र, याची किंमत मोठ्या हेलिकॉप्टर एवढीच आहे. वाचा: या हेलिकॉप्टरचे काम व्यक्तींना एकाठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचे नाही. तर यापेक्षा वेगळे आहे. या हेलिकॉप्टरबाबत सविस्तर जाणून घेऊया. हे हेलिकॉप्टर असून, याचा उद्देश संवेदनशील आणि महत्त्वाच्या अभियानात लष्कराची मदत करणे आहे. हे रिमोटने नियंत्रित होणारे ड्रोन असून, याला सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. याचा वापर नागरिकांचा बचाव व शोधमोहिमांसाठी देखील केला जातो. नॉर्वे स्थित नावाच्या कंपनीने या छोट्या हेलिकॉप्टरची निर्मिती केली असून, याचा वापर अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, तुर्की, नॉर्वे, नेदरलँड, पोलंड, न्यूझीलंड आणि भारताच्या सशस्त्र दलांकडून केला जातो. हे हेलिकॉप्टर १० सेमी लांब आणि २.५ सेमी रुंद आहे. PD-100 Black Hornet ला कमीत कमी २० मिनिट संचालित करण्यासाठी ऑपरेटरला प्रशिक्षित केले जाते. या हेलिकॉप्टरमध्ये तीन कॅमेरे आहेत. यातील एक कॅमेरा पुढे पाहण्यासाठी एक खाली लक्ष ठेवण्यासाठी व एक खालील बाजूला ४५ डिग्रीमध्ये लक्ष ठेवण्याचे काम करतो. जेणेकरून, सर्वठिकाणी लक्ष ठेवता येईल. एक ब्लॅक हॉर्नेट पॅकेजमध्ये दोन हेलिकॉप्टर असतात. हे ९० टक्के चार्जमध्ये २०-२५ मिनिटं उड्डाण घेऊ शकतात. ड्रोन हेलिकॉप्टरचा स्पीड ताशी २१ किमी आहे. किंमतीबद्दल सांगायचे तर याच्यासाठी जवळपास १ कोटी रुपये मोजावे लागतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pPZqqm