Full Width(True/False)

भारती सिंगच्या घरी येणार चिमुकला पाहुणा, पण म्हणाली..

मुंबई : छोट्या पडद्यावरची कॉमेडी क्विन आणि तिचा नवरा यांनी चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अगदी बरोबर वाचलं.... भारती सिंग लवकरच आई होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारती गरोदर असल्याची चर्चा होती. आता ही गुड न्यूज खुद्द भारतीनेच तिच्या यूट्युब चॅनेलवरून दिली. 'हो मी आई होणार आहे' असं या व्हिडिओचं हेडिंग आहे. भारतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. आपल्या विनोदाने प्रेक्षकांना मनमुराद हसवणारी कॉमेडियन भारती सिंग एप्रिल महिन्याच्या अखेरीस अथवा मे महिन्याच्या सुरुवातील आई होणार असल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली. अलिकडेच भारतीने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, करोनाच्या पार्श्वभूमीवर आई होण्याचा विचार पुढे ढकलला आहे. याचं कारण देताना सांगितले की, इस्पितळात जाणं तिला सुरक्षित वाटत नाही. परंतु आता करोना परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे भारती आणि हर्ष त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन पाहुण्याच्या स्वागताला उत्सुक आहेत. चाहत्यांना गुड न्यूज देणारा मजेशीर व्हिडिओ भारतीने खास तिच्या स्टाईलमध्ये ही गुड न्यूज दिली. या व्हिडिओत भारती बाथरूमध्ये बसलेली दिसत असून ती म्हणते की, गेल्या सहा महिन्यांपासून ती प्रेग्नंसी टेस्ट करत आहे. ही टेस्ट करताना ती समोर कॅमेरा ठेवते. कारण तो सुवर्ण क्षण तिला कॅमेऱ्यात टिपायचा असतो. त्यानंतर भारती प्रेग्नंसी किटवर टेस्ट करते तेव्हा त्यावर दुहेरी रेघा तिला दिसतात. ते पाहून ती प्रचंड आनंदीत होते आणि तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात. हे हर्षचं बाळ नाही तर... आनंदाची बातमी समजल्यावर भारती आनंदाने नाचू लागते. ही गोड बातमी झोपलेल्या नवऱ्याला कशी सांगायची याचा विचार भारती करते. तेव्हा ती गंमतीत म्हणते की, हर्षला कसं सांगू की 'हे फक्त त्याचं बाळ नाही...' त्यानंतर ती म्हणते की 'म्हणजे हे आमच्या दोघांचं बाळ आहे.' हर्षला सप्राइज देते भारती भारती ही गुड न्यूज हर्षला अतिशय हटक्या पद्धतीने सांगते. बेडवर झोपलेल्या हर्षच्या आजूबाजूला ती बरेचसे स्पीकर ठेवते आणि प्रेग्नंसी कीट देखील ठेवते. त्यानंतर ती स्पीकरवरून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज प्ले करते. ते ऐकून झोपलेला हर्ष खडबडून जागा होतो. त्याला क्षणभर काही समजत नाही. परंतु नंतर त्याला ही गुड न्यूज समजते. त्यानंतर तो प्रचंड आनंदीत होतो. भारतीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर कलाकारांसोबतच चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. मुक्ती मोहन, जय भानुशाली, प्रिन्स नरोला, युवीका चौधरी यांचा समावेश आहे. तर बिग बॉस फेम अभिनेत्री जास्मिन भसीनने इन्स्टा स्टोरीमध्ये फोटो पोस्ट करत भारतीला शुभेच्छा दिल्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3EL9kzW