Full Width(True/False)

मलायका अरोरा- अर्जुन कपूरचं ब्रेकअप? फोटोमधून सत्य आलं समोर

मुंबई- आणि तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं जातं. असं असलं तरी काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपच्या बातम्या येत होत्या. पण त्यात काही तथ्य नसल्याचं दोघांच्या फोटोंनी दाखवून दिलं. दोघंही सध्या रोमॅण्टिक व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. दोघांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अर्जुनने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर अनेक फोटो टाकले. त्यातील एका फोटोत तो आपलं पिळदार शरीर दाखवताना दिसत आहे. यात त्याचा अर्धा चेहरा दिसतो. त्याचवेळी, दुसऱ्या फोटोमध्ये अर्जुन खुर्चीवर बसून आराम करत आहे. मलायकानेही तिच्या इन्स्टाग्रामवर तीन फोटो आणि दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा काही गैरसमजामुळे एकमेकांशी बोलत नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, त्यांचे हे फोटो पाहून ब्रेकअपच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं दिसून येतं. अर्जुन आणि मलायका यांच्या फोटोंमधील पार्श्वभूमी पाहिली तर कळून येतं की कपल एखाद्या समुद्र किनारी एकत्र वेळ घालवायला गेलं आहे. सध्या या दोघांनीही एकत्र फोटो शेअर केलेले नाहीत. सुरुवातीला मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर कधीही आपल्या नात्यावर मोकळेपणाने बोलले नाहीत. त्यांनी नात्याचा स्वीकारही कधी केला नाही. पण गेल्या काही वर्षात दोघांनी आपलं नातं अधिकृत केलं असून ते आता मोकळेपणाने बोलतात. अर्जुन आणि मलायका यांनीही त्यांच्या वयातील फरकाबाबत अनेकदा बोलले आहे. अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नुकताच तो 'भूत पोलीस' सिनेमात दिसला होता. यात त्याच्यासोबत सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. यानंतर अर्जुन जॉन अब्राहम, दिशा पाटनी आणि तारा सुतारियासोबत 'एक व्हिलन रिटर्न्स' सिनेमात काम करताना दिसणार आहे. मोहित सूरी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dhUtRn