Full Width(True/False)

Amazon offer : तब्बल ३३ हजारांच्या डिस्काउंटसह मिळतोय Asus चा ‘हा’ शानदार लॅपटॉप, ऑफर एकदा पाहाच

नवी दिल्ली : टेक कंपनी ला आपल्या दमदार लॅपटॉपसाठी ओळखले जाते. तुम्ही जर Asus TUF Dash F15 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर यावर आकर्षक ऑफर्स मिळत आहे. ई-कॉमर्स साइट वर हा लॅपटॉप डिस्काउंटसह उपलब्ध आहे. तुम्ही जर गेमिंग लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. वाचा: किंमत लॅपटॉपला याच वर्षी भारतात लाँच केले होते. लॅपटॉपची किंमत १,४०,९९० रुपये आहे. मात्र, Amazon वर ३३,००० रुपयांच्या डिस्काउंटनंतर १,०७,९९० रुपयात खरेदी करू शकता. ऑफर तुम्ही या लॅपटॉपला ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. लॅपटॉपवर १८,३०० रुपये एक्सचेंज ऑफर मिळत आहे. तसेच, Union Bank Debit Mastercard व City Union Bank Debit Mastercard ने खरेदी केल्यास १५० रुपये डिस्काउंट मिळेल. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन Asus TUF Dash F15 लॅपटॉपमध्ये १५.६ इंच फुल HD IPS डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज आणि ३ ms रिस्पॉन्स स्पीड आहे. गेमिंगसाठी यात कूलिंग सिस्टम दिली आहे. लॅपटॉपमध्ये ७६ Whr ची बॅटरी दिली असून, एकदा चार्ज केल्यावर १६ तास टिकते. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ५.२, वाय-फाय ६, थंडरबोल्ट ४ पोर्ट आणि ब्लू बॅकलिट कीबोर्ड दिला आहे. यामध्ये ११th जनरेशन Intel Core i७-११३७०H प्रोसेसरसह १६ जीबी रॅम आणि १ टीबी एसएसडी स्टोरेज मिळते. गेमर्ससाठी यात Nvidia GeForce RTX 3070 ग्राफिक्स दिले आहे. Asus TUF Dash F15 हा एक शानदार लॅपटॉप असून, याचे डिझाइन कॉम्पॅक्ट आहे. मात्र, यात वेबकॅम नाही. त्यामुळे व्हिडिओ कॉलिंगसाठी थर्ट पार्टी वेबकॅम खरेदी करावा लागेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3IfdulO