Full Width(True/False)

नवीन वर्षाची सुरुवात होणार दणक्यात! हे चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

गेली दोन वर्षं मनोरंजनसृष्टीसाठी आव्हानात्मक होती. करोनाच्या दोन लाटांनी आणि त्यामुळे उद्भवलेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीनं इतर व्यवसायांप्रमाणे सिनेसृष्टीचीही घडी विस्कटली. आता करोनाचं सावट काही अंशी कमी होतंय. जगात आणि काही प्रमाणात देशातही करोनाच्या नव्या विषाणूची चर्चा आहे. पण, त्याला न घाबरता प्रतिबंधात्मक उपाययोजना आखत नववर्षात सिनेमांच्या प्रदर्शनाची योजना आखायला बॉलिवूडनं सुरुवात केली आहे. एकीकडे वर्ष सरत असताना; सिनेनिर्माते नववर्षातील त्यांच्या आगामी सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा स्वतःकडे राखून ठेवण्याच्या तयारीत आहेत. परिणामी, हळूहळू २०२२चं बॉलिवूडचं 'फिल्मी कॅलेंडर' आकार घेऊ लागलंय. सध्या महाराष्ट्र राज्यात केवळ निम्म्या आसनक्षमतेत सिनेमागृहं कार्यान्वित आहेत. पण, पुढील वर्षी पूर्ण क्षमतेनं सिनेमागृह कार्यान्वित करण्याची परवानगी राज्य सरकार देईल; अशी सिनेसृष्टीला आशा आहे. परिणामी पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून सगळं पूर्ववत होऊन सिनेमांचं चित्रपटगृहातील प्रदर्शनही पूर्ण क्षमतेनं होईल; असा निर्माते, सिनेमागृह मालक आणि कलाकारांना विश्वास आहे. त्यामुळे २०२२ मध्ये बड्या सिनेनिर्मात्यांनी आणि कलाकारांनी खास तारखा त्यांच्या सिनेमांच्या प्रदर्शनासाठी अगोदरच राखून ठेवल्या आहेत. चाळीसहून अधिक सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. यातील बहुतांश सिनेमे प्रदर्शनासाठी पूर्ण तयार आहेत; तर काही सिनेमांच्या चित्रीकरणाचे आणि पोस्ट प्रोडक्शनचं काम सध्या वेगानं सुरू आहे. पण, इतक्यावरच बॉलिवूड सिनेसृष्टी थांबलेली नाही. आकडेवारीनुसार जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान तब्बल ५२२ हिंदी सिनेमांचे सेन्सॉर प्रमाणपत्र मंजूर झालं आहे. या सिनेमांपैकी निम्म्याहून अधिक सिनेमे अद्याप प्रदर्शितच झालेले नाहीत. त्यामुळे येत्या वर्षात बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनासाठी सिनेमांची गर्दी पाहायला मिळू शकते. परंतु, या सगळ्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे या शंका नाही. कारण, प्रेक्षकांसमोर सिनेमांचे अनेक पर्याय उपलब्ध असतील. वर्षाची सुरुवात दणक्यात!ज्या सिनेमांची सिनेरसिक आतुरतेने वाट पाहत होते; तो दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा '' हा सिनेमा नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस यतोय. ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट या बड्या कलाकारांच्या यात मुख्य भूमिका आहेत. तर दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा '', अक्षयकुमारचा '', जॉन अब्राहमचा '' आणि विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित '' जानेवारीत प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे वर्षाची सुरुवात दणक्यात होणार आहे. २०२२ चं फिल्मी कॅलेंडर :जानेवारी : आरआरआर, राधे श्याम, पृथ्वीराज, अॅटॅक, द काश्मिर फाइल्स फेब्रुवारी : बधाई दो, मेजर, गंगुबाई काठियावाडी, जयेशभाई जोरदार मार्च : बच्चन पांडे, शमशेरा, भुलभुलैय्या २, अनेक एप्रिल : रॉकेटरी, धाकड, लाल सिंग चड्ढा, केजीएफ २, मेडे, हिरोपंती २ मे : रॉकेटगँग, मिशन मजनू, आँख मिचोली, हिट जून : मैदान, गोविंदा नाम मेरा, डॉक्टर जी, जुग जुग जिओ जुलै : एक व्हिलन रिटर्न, सर्कस, फोन भूत, थँक गॉड ऑगस्ट : आदिपुरुष, रक्षाबंधन सप्टेंबर : विक्रम वेधा ऑक्टोबर : तेजस, मिस्टर नाद मिसेस माही, रामसेतू (दिवाळी) नोव्हेंबर : शहजादा, योद्धा, भेडीया डिसेंबर : गणपथ


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33d81fd