Full Width(True/False)

मोटोचा नवा स्मार्टफोन लाँच, सर्वात पॉवरफुल प्रोसेसर आणि ६० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, पाहा किंमत

नवी दिल्लीः Motorola Edge X30 ला लाँच करण्यात आले आहे. हा फोन लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट सोबत येणारा पहिला फ्लॅगशीप फोन आहे. हा मोटोरोलाचा हाय एन्ड फ्लॅगशीप फोन आहे. यात ६० मेगापिक्सलचा सेल्फी स्नॅपर, 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट, बॅक मध्ये 50MP डुअल कॅमेरा, AMOLED डिस्प्ले सारखे टॉप स्पेसिफिकेशन दिले आहेत. यासोबतच कंपनीने अंडर डिस्प्ले कॅमेरा सेन्सर सोबत स्पेशल एडिशनची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे. Moto Edge X30 ची किंमत Moto Edge X30 स्मार्टफोनला सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत RMB 3,199 (जवळपास ३८ हजार रुपये) आहे. 8GB/256GB मॉडलसाठी RMB 3399 (जवळपास ४० हजार ३०० रुपये), 12GB/256GB व्हर्जनसाठी RMB 3,599 (जवळपास ४२ जार ७०० रुपयांपासून सुरू होते. स्पेशल एडिशन X30 फक्त 12GB/256GB मॉडल मध्ये येतो. याची किंमत RMB 3,999 (जवळपास ४७ हजार ५०० रुपये) आहे. कंपनी मर्यादीत वेळेसाठी स्पेशल डिस्काउंट सुद्धा देत आहे. यानंतर ग्राहक याला स्वस्तात किंमतीत खरेदी करू शकतील. 8GB / 128GB ची किंमत RMB 2,999 (जवळपास ३५ हजार ६०० रुपये), 8GB / 256GB साठी RMB 3,199 (जवळपास ३८ हजार रुपये) आणि RMB 3,399 (जवळपास ४० हजार ३०० रुपये) किंमत आहे. फोनला निळ्या आणि पांढऱ्या रंगात लाँच करण्यात आले आहे. या फोनला चीनमध्ये महिन्याच्या अखेरपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. Moto Edge X30 स्पेसिफिकेशंस Moto Edge X30 मध्ये ६.७ इचाचा OLED FHD+ डिस्प्ले दिला आहे. ज्यात 144Hz रिफ्रेश रेट, 576Hz टच सँपलिंग रेट, 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन, 100 प्रतिशत DCI-P3 color gamut, HDR10+, पंच-होल कटआउट आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ झेन १ चिपसेट सोबत येतो. ग्राफिक्ससाठी एड्रेनो जीपीयू सोबत जोडला आहे. लेटेस्ट क्वॉलकॉम एसओसीकडून शीप केला जाणारा हा पहिला स्मार्टफोन आहे. फोन Android 12 OS वर MyUI 3.0 क्लीन स्टॉक UI वर चालतो. यात 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 5000mAh ची बॅटरी दिली आहे. Moto Edge X30 मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा दिला आहे. यात f/1.88 अपर्चरचा 50MP चा प्रायमरी OV50A40 सेंसर, 5MP चा अल्ट्रा-वाइड-एंगल लेंस आणि 2MP चा तिसरा सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 60MP चा स्नॅपर दिला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 रॅम, डॉल्बी एटमॉस आणि 256GB पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेज दिले आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31NWvqh