Full Width(True/False)

अनुष्काने कतरिना- विकीला शुभेच्छा दिल्या की टोमणा मारला!

मुंबई- अखेर आणि कायमचे एकमेकांचे झाले. दोघांचे शाही लग्न राजस्थानमध्ये झाले, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्न सोहळ्यानंतर दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले. यानंतर अनुष्का शर्मा, आलिया भट्ट आणि दीपिका पादुकोणसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी फोटोंवर कमेंट करून त्यांचं अभिनंदन केलं. दरम्यान, कतरिना- विकी आता आणि विराट कोहलीचे सख्खे शेजारी होणार असल्याची बातमी समोर येत आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, विराट आणि अनुष्काने मुंबईतील जुहू येथील इमारतीत दोन मजले विकत घेतले आहेत. याच इमारतीत विकीने आठव्या मजल्यावर पाच वर्षांसाठी भाड्याने अपार्टमेंट घेतलं आहे. भाड्याची किंमत महिन्याला सुमारे ९ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. आलिशान सुविधांनी युक्त अशी ही सी फेसिंग इमारत आहे. विकी आणि कतरिनाचं नवीन घर ५ हजार चौरस फुटांचे आहे. एकमेकांचे झाले विकी-कतरिना कतरिना आणि विकीने लग्नगाठ बांधली. या रॉयल वेडिंगला सिनेसृष्टीतील अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. एकूण १२० पाहुणे या शाही लग्नाचे साक्षीदार होऊ शकले. जोडप्याने शेअर केले लग्नाचे फोटो कतरिना आणि विकीने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले- 'आमच्या हृदयात फक्त प्रेम आणि कृतज्ञता आहे, ज्यामुळे आम्ही या क्षणापर्यंत पोहोचलो आहोत. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद घेऊन आम्ही या नव्या प्रवासाची एकत्र सुरुवात करत आहोत.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33jg2zt