मुंबई : बिग बॉस मराठीचं तिसरे पर्व आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचलं आहे. येत्या काही दिवसांत चा ग्रँड फिनाले होणार असून त्यातून विजेता स्पर्धकाची घोषणा होणार आहे. बिग बॉसच्या घरातून गेल्या आठवड्यात बाहेर पडली. सोनाली घराबाहेर पडल्यामुळे विशाल निकम, विकास पाटील आणि मीनल शाह यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यावर सोनालीने सर्वात आधी जाऊन तिच्या आवडत्या व्यक्तीची भेट घेतली. सोनालीने घेतली अक्षय वाघमारेची भेट घराबाहेर आल्यानंतर सोनालीने याची भेट घेतली. बिग बॉस मराठी ३ मधून सर्वात आधी अक्षय वाघमारे घराबाहेर जाणारा स्पर्धक होता. खुद्द अक्षयनेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या आणि सोनालीच्या भेटीचा फोटो शेअर केला. अक्षयने सोनाली सोबतचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली. त्यात त्याने लिहिले आहे की, 'आता चर्चा तर होणारच... बिग बॉसच्या घराबाहेर आमची पहिली भेट' या फोटोमध्ये सोनाली आणि अक्षय यांच्या चेहऱ्यावर भेटीचा आनंद स्प दिसत आहे. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर सोनालीची ही सोशल मीडियावरची पहिली आहे. बिग बॉसच्या घरात असताना बरेचदा सोनालीला अक्षयची आठवण यायची. तिने तसे अनेकदा बोलूनही दाखवले होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून सोनाली पाटील बाहेर गेल्यामुळे तिच्या चाहत्यांसह सर्वांना धक्का बसला. अनेकांनी आपली नाराजी सोशल मीडियावरूनही व्यक्त केली. सोनालीला मीरापेक्षा कमी मते मिळाली यावर विश्वास नसल्याचे मत अनेकांनी मांडले. तर काहींनी म्हटले की, मीराला घरामध्ये फक्त भांडण करण्यासाठी आणि त्यातून मिळणारा टीआरपीसाठी घरात ठेवले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3piyoZS