Full Width(True/False)

लेकाच्या स्वप्नासाठी आर माधवननं घेतला मोठा निर्णय, सोशल मीडियावर होतंय प्रचंड कौतुक

मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमातील लोकप्रिय अभिनेता आर. माधवन त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये होणा-या पार्ट्या, बॉलिवूडमधील वाद, ग्रुपीझम या कशामध्ये आर माधवनचा सहभाग नसतो. उलट कामाव्यतिरीक्तचा वेळ तो त्याच्या कुटुंबाला देतो. इतकेच नाही तर अनेक सणा-समारंभाला आपल्या कुटुंबियांसोबतच तो . आता पुन्हा एकदा तो कुटुंबासाठी घेतलेल्या निर्णयामुळं चर्चेत आला आहे. आर माधनवचा लेक वेदांत सिनेसृष्टीपासून दूर आहे. तो माधवनप्रमाणे क्रीडाप्रेमी आहे. वेदांतनं स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिलं होतं. तसंच बेंगळुरू इथं झालेल्या ४७ व्या ज्युनिअर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये आर. माधवनच्या मुलानं, वेदांतनं सात पदके जिंकली होती. त्यामध्ये चार रौप्य पदके, तीन कांस्य पकांचा समावेश आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेदांतने ८०० मीटर फ्रीस्टाईल स्विमींग, १५०० मीटर फ्रीस्टाईल स्विमिंग, ४*१०० मीटर फ्री स्टाईल स्विमींग आणि ४*२०० मीटर फ्री स्टाईल स्विमिंग रीले पोहण्याच्या प्रकारात रौप्य पदक तर १००, २०० आणि ४०० मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये त्यानं कांस्य पदक मिळवलं होतं. त्यामुळं वेदांतचं स्विमिंग करिअर पुढं घेऊण जाण्यासाठी माधवननं मोठा निर्णय घेतला आहे. त्यानं काही वर्ष कुटुंबासह काही वर्ष दुबईत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी वेदांत तयारी करत आहे. त्याच्या सरावात कुठंही, काहीही कमी पडू नये यासाठी माधवननं हा निर्णय घेतल्याचं म्हचटं जात आहे. निर्णयाचं कौतुकआर माधवननं घेतलेल्या या निर्णयाला नेटकरी आणि त्याच्या चाहत्यांकडून पाठिंबा मिळत असून माधवन बाप-लेकांचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3277KdQ