Full Width(True/False)

Upcoming Smartphones: २०२२ मध्ये ‘या’ ७ फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची होणार एंट्री, पाहा संभाव्य किंमत-फीचर्स

२०२१ हे वर्ष संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. या वर्षात भारतासह जागतिक बाजारात एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन्स लाँच झाले आहेत. दर आठवड्याला कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स सादर करत आहेत. आता वर्ष २०२२ मध्ये देखील काही दमदार स्मार्टफोन्स भारत आणि जागतिक बाजारात लाँच होणार आहेत. यावर्षी सॅमसंग, शाओमी आणि अ‍ॅपलच्या फोन्सला ग्राहकांची मोठी पसंती मिळाली. २०२२ मध्ये देखील कंपन्या अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोन्स सादर करणार आहेत. २०२२ मध्ये लाँच होणाऱ्या फोन्समध्ये Samsung Galaxy S22 सीरिज, वनप्लस १० सीरिज आणि शाओमी १२ सीरीजचा समावेश आहे. तसेच, iPhone 14 सीरिज, iPhone SE3, Vivo X80 सीरिज आणि Samsung Galaxy S21 FE देखील लाँच होणार आहे. या अपकमिंग स्मार्टफोन्सच्या संभाव्य किंमती आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Samsung Galaxy S22 सीरिज
​Samsung Galaxy S22 सीरिज

Samsung या सीरिज अंतर्गत Samsung Galaxy S22, Samsung Galaxy S22 Plus आणि Samsung Galaxy S22 Ultra या तीन स्मार्टफोन्सला लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy S22 चे डिझाइन गॅलेक्सी एस २१ शी मिळते-जुळते आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ झेन १ चिपसेट मिळेल. तसेच एचडी डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह ही सीरिज लाँच होऊ शकते.

​OnePlus 10 सीरिज
​OnePlus 10 सीरिज

ही सीरिज फेब्रुवारी २०२२ मध्ये लाँच होण्याची शक्यता असून, याची संभाव्य सुरुवाती किंमत ४४,९९९ रुपये आहे. रिपोर्टनुसार, OnePlus 10 Pro स्मार्टफोनमध्ये १२५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी, ६.७ इंच क्यूएचडी प्लस डिस्प्ले, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, Qualcomm चा पॉवरफुल प्रोसेसर मिळेल. या सीरिज अंतर्गत कंपनी OnePlus 10 आणि OnePlus 10 Pro स्मार्टफोन्सला लाँच करू शकते.

​Xiaomi 12 सीरिज
​Xiaomi 12 सीरिज

Xiaomi 12 सीरिजला जानेवारी २०२२ मध्ये लाँच केले जाईल. फोनची सुरुवाती किंमत ६९,९९० रुपये असण्याची शक्यता आहे. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. यात ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, पंच-होल सेल्फी कॅमेरा, या सीरिज अंतर्गत Xiaomi 12, Xiaomi 12X, Xiaomi 12 Pro आणि Xiaomi 12 Ultra सारख्या स्मार्टफोन्सला लाँच केले जाईल. रिपोर्टनुसार, फोन फुलएचडी प्लस डिस्प्ले, ६७ वॉट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएच बॅटरीसोबत येईल.

​iPhone 14 सीरिज
​iPhone 14 सीरिज

iPhone 14 सीरिजला सप्टेंबर २०२२ मध्ये लाँच केले जाईल. फोनची सुरुवाती किंमत १,१५,०० रुपये असण्याची शक्यता आहे. फोनच्या लाँचिंगबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नाही. फोनमध्ये ६.१ इंच डिस्प्ले दिला जाईल. तर प्रो मॉडेल ६.७ इंच डिस्प्लेसह येईल. यात ४८ मेगापिक्सल मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल.

iPhone SE3

जवळपास ३० हजार रुपये किंमतीत हा फोन मार्च २०२२ मध्ये लाँच होऊ शकतो.हा सर्वात स्वस्त आयफोन असण्याची शक्यता असून, फोनला 5nm A15 बायोनिक चिपसेटसह सादर केले जाईल. फोन ५जी नेटवर्क सपोर्टसह येईल. यात ४.७ इंच एलसीडी डिस्प्ले, ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि सिंगल सेल्फी कॅमेरा मिळेल.

​Vivo X80 सीरिज
​Vivo X80 सीरिज

विवोची ही सीरिज फेब्रुवारी २०२२ मध्ये लाँच होईल. याची किंमत ६० ते ७० हजार रुपये असू शकते. सीरिज अंतर्गत एक्स ८० प्रो आणि एक्स ८० प्रो+ फोनला सादर केले जाऊ शकते. फोन १२०Hz FHD + डिस्प्ले, ४ नॅनो मीटर डायमेंशन २००० चिपसेसट, अँड्राइड ११, ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि १२ मेगापिक्सल टेलिफोटो लेंससह येईल.

Samsung Galaxy S21 FE

या स्मार्टफोनला जवळपसा ४५ हजार रुपये सुरुवाती किंमतीत ४ जानेवारी २०२२ ला CES मध्ये लाँच केले जाऊ शकते. फोनला ३२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, ६.४ इंच एमोलेड डिस्प्ले, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट, ८ जीबीपर्यंत रॅम, स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट आणि ४५०० एमएएच बॅटरीसह लाँच केले जाईल.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3E6AYX2