Full Width(True/False)

अभिनेत्याची कंगनाशी लग्न करण्यासाठी पत्नीला सोडण्याची तयारी

मुंबई : बॉलिवूडची क्विन म्हणून ला कोण ओळखत नाही. ३४ वर्षांची कंगना अजूनही अविवाहित असून तिच्या आयुष्यात येणाऱ्या खास व्यक्तीची ती वाट पाहत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याला कंगनाशी लग्न करण्याची इच्छा असून त्यासाठी तो पहिल्या पत्नीलादेखील सोडायला तयार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून आहे. वाचून धक्का बसला ना.. परंतु स्वतः अनिल कपूर यांनीच याच्या 'कॉफी विद करण' कार्यक्रमात हे सांगितलं. कंगनाशी लग्न करण्याची इच्छा करण जोहरने त्याच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून आलेल्या अनिल कपूर यांना काही प्रश्न विचारले. त्यामध्ये त्याने अनिल यांना विचारले होते की, अशा एका महिलेचं नाव सांगा की तिच्यासाठी तुम्ही तुमची पत्नी सुनिता कपूर यांनाही सोडू शकाल. त्यावर अनिल यांनी कंगनाची भरभरून कौतुक करत तिचं नाव घेतलं. भलेही अनिल यांनी मस्करीमध्येच कंगनाचं मस्करीमध्ये नाव घेतले होतं, परंतु सोशल मीडियावर यावरून अनिल यांना ट्रोल केलं गेलं. कोण आहे सुनिता कपूर अनिल कपूर आणि सुनिता यांनी १९८४ मध्ये लग्न केलं. या दोघांचं लग्न झालं तेव्हा सुनिता मॉडेलिंगच्या क्षेत्रातील आघाडीचं नाव होतं. सुनिता यांचे वडील बँकर होते. या दोघांचं लग्न झालं तेव्हा अनिल यांनी अभिनयाच्या क्षेत्रात सुरुवात होती. आता सुनिता कपूर फॅशन डिझायनर आहेत. या दोघांना सोनम, रिया आणि हर्षवर्धन कपूर अशी तीन मुले आहेत. सोनम आणि हर्षवर्धन अभिनयाच्या क्षेत्रात आहेत. तर रिया कपूर निर्माती आहे. कंगना रणौतच्या कामाबद्दल सांगायचे तर तिचे तेजस, धाकड, इमरजन्सी यांसह अनेक सिनेमे आगामी काळात रिलीज होणार आहेत. मध्यंतरी कंगनाची प्रमुख भूमिका असलेला थलायवी सिनेमा रिलीज झाला. हा तिच्या करिअरमधील सर्वोत्तम सिनेमा असल्याचं सांगितलं जातं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mhVPQY