मुंबई- बॉलिवूड स्टार सलमान खानला शनिवारी रात्री त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर साप चावला. ही बातमी समजताच सलमानचं संपूर्ण कुटुंब त्याला पाहण्यासाठी फार्महाऊसवर पोहोचलं. सलमानला चावणारा साप विषारी नव्हता आणि इस्पितळात प्राथमिक उपचार करून त्याला घरी सोडण्यात आलं. सध्या सलमान त्याच्या फार्म हाऊसवर आराम करत त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या मुद्द्यावर सलमानचे वडील यांनी ETimes शी बोलताना सांगितलं की, 'जेव्हा सलमानला इंजेक्शनसाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा आम्ही सगळेच काळजीत होतो. सुदैवाने साप विषारी नसल्याचं कळलं.' पुढे विचारले असता सलीम खान म्हणाले, 'सलमान फार्महाऊसवर परत आला आणि त्यानंतर काही तास झोपला. तो आता ठीक आहे आणि काळजी करण्यासारखं काही नाही. पण हो, तेव्हा मी घाबरलो होतो.' सलीम खान यांनी सांगितलं की, त्यांच्या फार्महाऊसवरील कर्मचाऱ्यांनाही अनेकदा साप आणि विंचू चावला आहे. मात्र, फार्महाऊसच्या आजूबाजूच्या जंगलातील बहुतेक साप विषारी नसतात. सलीम खान म्हणाले, 'जेव्हा सलमानला साप चावला, तेव्हा आमच्या कर्मचाऱ्यांनी तो साप पकडला. विषारी नसलेल्या सापांना मारू नये, असं आम्ही त्यांना सांगितलं आहं. त्यामुळे सलमानला चावणारा साप विषारी नाही हे कळल्यावर आम्ही त्याला पुन्हा जंगलात सोडलं. सापाला फार्महाऊसपासून थोड्या अंतरावर जंगलात सोडण्यात आलं.' दरम्यान, दरवर्षी ख्रिसमस, २७ डिसेंबर रोजी येणारा वाढदिवस आणि नवीन वर्ष सगळं काही पनवेलच्या फार्म हाऊसवर साजरा करतो. यंदा मुंबई आणि बॉलिवूडमधून सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीला कोण पोहोचतं हे पाहणं बाकी आहे. पुन्हा एकदा करोना विषाणूचं नवं वेरिएंट ओमिक्रॉन मोठ्या प्रमाणात पसरत आहे. यामुळ सलमानच्या वाढदिवसाला मोजकेच सेलिब्रिटी उपस्थित राहतील.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ptdnM2