Full Width(True/False)

यावर्षीचे दाक्षिणात्य सिनेमे पाहिले का? हे सिनेमे चुकवू नका

मुंबई- दिवसेंदिवस दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग वाढतच चालला आहे.त्यामुळेच दाक्षिणात्य चित्रपट निर्माते प्रादेशिक भाषेतील चित्रपट आता देशभरात प्रदर्शित करू लागले आहेत. २०२१ वर्षात प्रदर्शित झालेले सिनेमे हे देशभरात रिलीज करण्यात आले होते. विशेष म्हणजे या सिनेमांनी बॉक्स ऑफिसावर चांगली कमाईही केली. परंतु २०२१ मध्ये प्रदर्शित झालेले काही सिनेमे विशेष गाजले. २०२१ वर्ष संपायला काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी वर्षाभरातले उत्कृष्ट दाक्षिणात्य सिनेमे कोणते याची यादी घेऊन आलो आहोत. या यादीत पहिलं नाव आहेत मल्याळम भाषेत प्रदर्शित झालेला दृश्यम २ या सिनेमाचं. या वर्षी प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट थ्रिलर ड्रामा सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे. सुपरस्टार मोहनलाल यांची प्रमुख भूमिका आहे. मोहनलाल यांचा अभिनय पाहून कधीच जाणवत नाहीत की सिनेमाचा विषय खूप जड आहे. हा सिनेमा जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर आजच पाहा. द ग्रेट इंडियन किचन द ग्रेट इंडियन किचन हाही एक उत्कृष्ट मल्याळम सिनेमा असून प्रत्येक सिने चाहत्याने पाहण्यासाराखा आहे. सिनेमाचा विषय क्रांतीकारक असून हजारो वर्षांपासून अघोषित पद्धतीने महिलांच्या हिश्याला आलेल्या घरकामावर सिनेमा भाष्य करतो. निमिषा सजयन आणि सूरज वेंजारामूडु हे कलाकार प्रमूख भूमिकेत आहेत. सिनेमाला सर्वात्कृष्ट केरळ राज्य फिल्म अवॉर्ड, जियो बेबी हिला बेस्ट स्क्रीनप्ले अवॉर्ड आणि टोनी बाबू याला सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला आहे. मागच्या दोन महिन्यात मुख्य चर्चेत जर कोणता सिनेमा असेल तर तो जय भीम आहे. २ ऑक्टोबर रोजी सिनेमा प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासून सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. तेलगू सुपरस्टार सूर्याची मुख्य भूमिका यात आहे. सूर्याने सिनेमात वकीलाची भूमिका साकारली आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमात देशातील सामाजिक विषमतेवर भाष्य केलं आहे. अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूसोबत घटस्फोट घेतल्यानंतर चर्चेत आलेला अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिकेत हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा एक प्रेम कथा असून नागा चैतन्य आणि साई पल्लवी हे या चित्रपटाची सर्वात मोठी संपत्ती होती.या रोमँटिक चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर कममुला यांनी केले आहे. अभिनेता विजय सेतुपती व अभिनेता विजय थलापती यांच्या मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर खूप गाजला होता. करोना निर्बंधाचे काळे सावट चित्रपटावर असतानासुद्धा सिनेमाने चांगली कमाई केली होती. क्राईम थ्रिलर प्रकारात मोडणाऱ्या सिनेमात विजय सेतुपती निगेटिव्ह भूमिकेत आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित या सिनेमात विजय थलापती आणि अभिनेत्री मालविका मोहनन हे मुख्य भूमिकेत होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pxbFcE