Full Width(True/False)

अभिनेत्रींबाबत सिनेसृष्टीचा दृष्टीकोन बदलतोय असं तुला वाटतं का? रविना म्हणते....

उपमा सिंग ० ओटीटीवर (ओव्हर द टॉप) पदार्पणासाठी '' या वेब सीरिजची निवड का केली?- मला याआधी अनेक वेब सीरिजमध्ये काम करण्याबाबत विचारण्यात आलं होतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून मी मोजकं पण दर्जेदार विषय घेऊन काम करण्यावर भर देतेय. कोणत्याही कलाकृतीची निवड करताना ती सशक्त स्त्रीची भूमिका आहे का हे बघतानाच तो विषय समाजाला चांगला संदेश देईल याकडेही मी लक्ष देते. मला अनेक दिवसांपासून निडर पोलिसाची भूमिका साकारायची होती. 'अरण्यक'मध्ये या साऱ्या बाबी असल्यानं मी त्या सीरिजची निवड केली. ० स्त्रियांना अनेकदा घर आणि नोकरी सांभाळताना नोकरी सोडावी लागते. अनेक अभिनेत्रीही लग्न झाल्यावर यासाठी ब्रेक घेतात. पुरुष मात्र या जबाबदारीतून सुटतात; यावर तुझं मत काय ?- हो हे अगदी खरं आहे. आपल्याकडे पुरुषांनी बाहेर काम करावं आणि स्त्रियांनी घर सांभाळावं असा समज असल्यानं ही जबाबदारी पुरुषांवर येत नाही. मात्र आता काळ बदलत असून अनेक स्त्रिया नोकरी करत त्यांची घरातील जबाबदारीही सांभाळत आहेत. 'अरण्यक'मध्ये मीही अशीच दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या कस्तुरी डोगराची भूमिका साकारत असून घर आणि नोकरी सांभाळणाऱ्या महिलांना आपण पाठिंबा द्यायला हवा असा संदेश यातून दिला आहे. ० अभिनेत्रींबाबत सिनेसृष्टीचा दृष्टीकोन बदलतोय असं तुला वाटतं का? लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपतं असे समज आता मागे पडत आहेत का ?- हो... असे सर्व समज आता मागे पडत आहेत. पंधरा वर्षांपूर्वी अभिनेत्रीचं लग्न झालं म्हणजे तिचं करिअर संपलं असा गैरसमज होता. आता मात्र हे सगळं मागे पडलं असून स्त्रियांसाठी खास दमदार भूमिका लिहिल्या जात आहेत. अनेक सशक्त अशा स्त्री भूमिका येत आहे. भविष्यात मी करत असलेल्या चार वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमांमध्ये मला अशाच सशक्त भूमिका मिळाल्या आहेत. सिनेसृष्टीत स्त्रियांना आता त्यांचा हक्क मिळतोय. ० अनेक जण सोशल मीडियावर जे विषय बोलायला टाळतात; त्याच विषयांवर तू बिनधास्त बोलतेस. स्पष्टपणे मतं मांडताना संकटांचा सामना करावा लागतो का?- मी या देशाची नागरिक असल्यानं सर्वप्रथम अशा विषयांवर बोलणं ही माझी जबाबदारी आहे असं मला वाटतं. बिनधास्तपणे बोलल्यामुळे मला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेक विषयांवर मी माझं मत मांडल्यावर 'तू अभिनेत्री आहे. तू तुझं काम कर' असा सल्ला दिला जातो. मी अभिनेत्री आहे तर मला देशात बोलायचा अधिकार नाहीय का? मी सुशिक्षित सुजाण नागरिक असून माझ्या देशातील अनेक विषयांवर बोलणं ही मला माझी जबाबदारी वाटते आणि तो माझा अधिकारही आहे. शब्दांकन : प्रथमेश गायकवाड, मुंबई विद्यापीठ


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3EPrf8G