Full Width(True/False)

iPhone 12 Pro: आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतोय ‘हा’ आयफोन, खरेदीवर होईल हजारो रुपयांची बचत

नवी दिल्ली : आणि iPhone 12 Mini च्या किंमती कमी केल्यानंतर आता ने च्या किंमतीत कपात केली आहे. आयफोन १२ प्रो बंपर डिस्काउंटसह ई-कॉमर्स साइट वर उपलब्ध आहे. iPhone 12 Pro च्या १२८ जीबी बेस व्हेरिएंटला १,१९,९०० रुपयात लाँच केले होते. आता Amazon वर खूपच कमी किंमतीत विक्री होत आहे. वाचा: Amazon India वर iPhone 12 Pro जवळपास २५ टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यामुळे फोनची किंमत २५ हजार रुपयांपर्यंत कमी झाली आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटची ९४,९०० रुपयात विक्री होत आहे. ही किंमत ग्रेफाइट, गोल्ड, पॅसिफिक ब्लू आणि व्हाइट कलर व्हेरिएंटची आहे. फोनच्या २५६ जीबी व्हेरिएंटची देखील ९९,९०० रुपये आणि ५१२ जीबी व्हेरिएंटची १,०७,९०० रुपयात विक्री होत आहे. ग्राहक Amazon India वरून कमी किंमतीत फोनला खरेदी करू शकतात. ही किंमत स्टॉक समाप्त होईपर्यंतच लिमिटेड आहे. सध्या कंपनी iPhone 13 Pro सीरिजवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. iPhone 12 Pro वर मिळणाऱ्या डिस्काउंटनंतर हा iPhone 13 आणि iPhone 13 Pro च्या तुलनेत एक चांगला फोन ठरतो. फोनमध्ये एक्स्ट्रा २एक्स टेलिफोटो कॅमेरा LiDAR सेंसर आणि आकर्षक डिझाइन मिळते. iPhone 12 Pro Max मध्ये नवीन आणि मोठे कॅमेरा सेंसर दिले आहे. त्यामुळे फोटोग्राफीसाठी तुम्ही iPhone 12 Pro ला प्राधान्य देऊ शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oQOqd8