Full Width(True/False)

'अंतिम'मधील भूमिकेसाठी मांजकरेकरांनी सलमानला दिला होता हा मोलाचा सल्ला

मुंबई: मनोरंजनविश्वातील अनेकांची मैत्री प्रेक्षकांच्या परिचयाची आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता-दिग्दर्शक आणि अभिनेता यांची दोस्ती. मात्र, सिनेमाचा विषय येतो तिथे मैत्री बाजूला ठेऊन ते ‘प्रोफेशनली’ काम करतात. सलमान खान आणि आयुष शर्मा यांची भूमिका असलेला ‘’ नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्त मांजरेकर यांनी मैत्री आणि व्यावसायिक नात्याचा समतोल कसा राखतो हे सांगितलं. ‘या सिनेमात पोलिसाची भूमिका करायची असेल आणि ती तुझ्या इतर ‘कॉप’ भूमिकांपेक्षा वेगळी ठरावी असं वाटत असेल, तर तुला आधी ‘सलमानगिरी’ बाजूला ठेवावी लागेल, असं मी त्याला सांगितलं होतं. सलमाननंही आपलं वलय बाजूला ठेवत हा सल्ला ‘सर आँखो पें’ ठेवत राजवीर सिंगची भूमिका वठवली. त्यानं आत्तापर्यंत केलेल्या अॅक्शन भूमिकांपैकी ही उत्कृष्ट भूमिका असल्याचं मला वाटतं,’ असं मांजरेकर सांगतात. ‘’ या मराठी सिनेमाचे हक्क सलमाननं विकत घेतले होते खरे; पण तो स्वत: यामध्ये काम करणार नव्हता. राजवीरच्या भूमिकेसाठी मनोज वाजपेयी किंवा अनिल कपूर या कलाकारांचे नाव समोर होते; पण ते जुळून न आल्याने सलमान तयार झाला, असंही त्यांनी सांगितलं. बॉक्स ऑफिसवर गर्दी 'अंतिम' चित्रपटात सलमान सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत असला तरीही सलमानचे चाहते बॉक्स ऑफिस बाहेर गर्दी करत आहेत. 'अंतिम'नं पहिल्या दिवशी फक्त ५ कोटींची कमाई केली होती. तर शनिवारी चित्रपटानं ७ कोटींची कामे केली होती. मात्र रविवारी मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर चित्रपटानं १८ कोटींचा टप्पा गाठला आहे. तर 'अंतिम' च्या प्रदर्शनानंतर 'सत्यमेव जयते २' च्या कमाई मध्ये प्रचंड घसरण झाली आहे. चार दिवसात 'सत्यमेव जयते २' ने फक्त ११ कोटींची कमाई केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31ueO3v