Full Width(True/False)

पती-पत्नीचा लग्नानंतरचा रोमान्स; ऋतुजा बागवेच्या 'जीव रंगलया' गाण्याची चर्चा

मुंबई: लग्नाआधीच्या अनेक लव्हस्टोरी आपण पहिल्या आहेत. लग्नानंतरची पती-पत्नी यांच्यातली लव्हस्टोरी नेमकी कशी असेल, या विषयावरचं ‘जीव रंगलया’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अभिनेत्री आणि या गाण्यात मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. विशाल हा ‘’ या नावानं सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. या गाण्याच्या टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या गाण्यात पती-पत्नीच्या लग्नानंतरचा रोमान्स, त्यांची जवळीक याची गोष्ट गाण्यात मांडली आहे. ओंकार माने दिग्दर्शित या गाण्याचे बोल आणि निर्मितीत समीर परब यांचे योगदान आहे. ओंकारनं आतापर्यंत २० गाणी दिग्दर्शित केली आहेत. या रोमँटिक गाण्याला प्रीतेश कामत यांनी संगीत दिलं आहे. भूषण गोसावी यांनी हे गाणं गायलं आहे. गाण्यातला ऋतुजा आणि विशालचा नवा अंदाच चाहत्यांना आवडतो आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3E1LC15