Full Width(True/False)

अल्लू अर्जुननं जिंंकली मराठी प्रेक्षकांची मनं; सोशल मीडियावर होतंय भरभरून कौतुक

मुंबई : दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला '' हा सिनेमा रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ४५ कोटी रुपयांची जबरदस्त अशी कमाई केली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. अल्लू अर्जुनचा दमदार ऍक्शन सिन आणि डायलॉगबाजीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे. या शिवाय आणखी एका कारणामुळे अल्लू अर्जुनने प्रेक्षकांची खास करून मराठी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत... अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा हा सिनेमा १७ डिसेंबर रोजी रिलीज झाला. त्याआधी या सिनेमाचे प्रमोशन मुंबईत झाले. हा कार्यक्रम मुंबईत होत असल्याचे निमित्त साधत प्रमोशनच्या कार्यक्रमावेळी अल्लू अर्जुनने चक्क मराठीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याचा अर्जुनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल झाला आहे. अल्लू अर्जुनने जेव्हा उपस्थितांशी संवाद साधायला उठला तेव्हा तो म्हणाला, 'सगळ्यांना माझा नमस्कार...' त्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या जल्लोषात त्याचे कौतुक केले. दरम्यान,पुष्पा सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला अल्लू अर्जुनच्या भूमिकेसाठी श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. पुष्पा सिनेमाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या सिनेमाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा भाग २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3GXBCYU