Full Width(True/False)

'इस्लाम सोडून हिंदू होणार', फिल्ममेकर अली अकबरची घोषणा

कोची- हेलिकॉप्टर अपघाताच्या दुर्दैवी घटनेत सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूच्या बातमीवर अनेकांनी हसणारे इमोजी शेअर केल्याचंही पाहायला मिळालं. यालाही अनेकांनी विरोध केला. मात्र केरळमधील एका सिनेनिर्मात्याला ही गोष्ट इतकी वाईट वाटली की त्याने इस्लाम सोडण्याचा निर्णय घेतला. केरळमधील सिनेनिर्माता आणि त्यांची पत्नी लुसियाम्मा यांनी इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. अकबर म्हणाले की, 'इस्लामच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि धार्मिक नेत्यांनीही मुस्लिमांच्या या कृतीला विरोध केलेला नाही. देशाच्या शूर सुपुत्राचा असा अपमान मान्य नाही.' अकबरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, 'माझा धर्मावरील विश्वास उडाला आहे.' अकबरने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'मला जन्मापासून मिळालेला चोळा मी काढून ठेवतो आहे. आजपासून मी मुस्लिम नाही. मी भारतीय आहे. माझा हा संदेश त्या लोकांसाठी आहे ज्यांनी भारताविरुद्ध हसणाऱ्या स्माईली पोस्ट केल्या होत्या.' अकबर यांच्या या पोस्टला अनेकांनी विरोध केला, तर अनेकांनी पाठिंबा दिला. यांसाठी त्यांना काहींनी अपशब्दही वापरले. ही पोस्ट नंतर फेसबुकवरून काढून टाकण्यात आली. टाइम्स ऑफ इंडियाशी झालेल्या संभाषणात अकबर म्हणाले, ' यांच्या मृत्यूची बातमी ऐकून हसणारे बहुतेक लोक मुस्लिम होते. रावत यांनी पाकिस्तान तसेच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कठोर पावले उचलल्यामुळे त्यांनी हे केले. मी अशा धर्माला चिकटून राहू शकत नाही.' अली अकबरने सांगितले की, तो पत्नीसह हिंदू धर्म स्वीकारणार आहे. याबाबत आवश्यक ती कागदोपत्री कार्यवाही केली जाईल. यापूर्वी ते भारतीय जनता पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य होते. ऑक्टोबरमध्ये पक्षनेतृत्वाशी झालेल्या वादानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. अकबर २०१५ मध्येदेखील प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा त्यांनी मदरशात शिकत असताना लैंगिक छळ झाल्याचा आरोप केला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3GxkSr4