Full Width(True/False)

स्मार्टफोन नव्हे तर 'या' प्रोडक्टवर फोकस करणार Nokia, कंपनीने केला मोठा खुलासा

नवी दिल्लीः हे वर्ष संपण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. टेक्नोलॉजी कंपन्यांनी २०२२ साठी आधीच रोडमॅप तयार केलेल आहेत. तसेच नवीन स्मार्टफोन कंपन्या रांगेत आहेत. तर स्मार्टफोन अॅक्सेसरीज लोकांना आकर्षित करीत आहेत. नोकिया पॅरेंट कंपनी सुद्धा यापेक्षा वेगळी नाही. इंडिया टूडे टेक च्या चर्चेत एचएमडी ग्लोबलचे प्रेसिडेंट यांनी आगामी वर्षासाठी कंपनीची योजना शेअर केली आहे. कोचर यांच्या माहितीनुसार, नोकिया २०२२ मध्ये भारतात आणखी ऑडिओ अॅक्सेसरीज आणण्यावर केंद्रीत करणार आहे. यात TWS इयरफ़ोन, वायर्ड हेडफ़ोन आणि अन्य यांचा समावेश आहे. कोचरने म्हटले की, टीडब्ल्यूएस ईयरबड्स आणि वायर्ड हेडफोन्स आता मोठ्या प्रमाणात बाजारात उद्यास आले आहे. त्यामुळे आम्ही त्यावर फोकस करण्याचे ठरवले आहे. नोकिया विविध उत्पादनासोबत या सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या किंमतीतील बँड मध्ये समावेश असणार आहे. या प्रोडक्टचा सेल ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही मधून केला जाणार आहे. कोचरने म्हटले की, किंमत बँडच्या आधारावर ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर आमचे प्रोडक्ट असतील. कोचरने हाही उल्लेख केला आहे की, नोकियाचा मोठा रिटेल नेटवर्क ऑफलाइन सेल मध्ये मदत करणारा आहे. ऑडिओ अॅक्सेसरीज आमच्या फोनसाठी चांगल्या रुपात काम करणार आहे. त्यासाठी याला दुप्पट करण्याची आमची योजना आहे. भविष्यात नोकिया फोनमध्ये ३.५ मिमी हेडफोन जॅकची अपेक्षा करता का ?, यावर कोचरने कोणतीही टिप्पणी केली नाही. याच्या सध्याच्या लाइनअप वर एक नजर टाकल्यास आम्हाला हे माहिती झाले की, भारतात ऑडियो अॅक्सेसरीज कॅटेगरीत नोकियाचा एक मर्यादीत पोर्टफोलियो आहे. कंपनीकडे आतापर्यंतच्या यादीत फक्त दोन प्रोडक्ट आहे. एक नोकिया पॉवर ईयरबड्स लाइट आहे. याची किंमत ३५९९ रुपये आहे. तर दुसरा नोकिया ट्रू वायरलेस ईयरबड्स आहे. याची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. हे दोन्ही ब्लूटूथ हेडफोन आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31S5OVM