नवी दिल्ली : चॅटिंग करताना आपण सर्वचजण इमोजीचा सर्वाधिक वापर करतो. आता Unicode Consortium ने एक नवीन रिपोर्ट जारी केला असून, यात २०२१ मध्ये कोणत्या चा सर्वाधिक वापर करण्यात आला त्याबाबत माहिती दिली आहे.या रिपोर्टमध्ये smileys आणि emotion संबंधित Emoji चा समावेश होता. तसेच ऑब्जेक्ट, अ‍ॅक्शन्स आणि स्पोर्ट्सच्या इमोजीचा देखील समावेश आहे. वाचा: रिपोर्टनुसार, ही सर्वात लोकप्रिय आहे. त्यानंतर हार्ट इमोजीचा सर्वाधिक वापर केला गेला. सर्व इमोजीमध्ये टीअर्स ऑफ जॉयचा ५ टक्क्यांपेक्षा अधिक वापर करण्यात आला. वर्षभरात Rolling on the floor laughing, Thumbs up, Loudly crying face, Folded hands, Face blowing a kiss, Smiling face with hearts, Smiling face with heart-eyes आणि Smiling face with smiling eyes या इमोजींचा देखील सर्वाधिक वापर करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, हा डेटा वर्ष २०१९ च्या तुलनेत जास्त वेगळा नाहीये. रिपोर्टमध्ये माहिती दिली आहे की, एकूण ३,६६३ पर्यायांपैकी १०० इमोजींचा सर्वाधिक वापर करण्यात आला आहे. याच १०० इमोजींचा २०२१ मध्ये ८२ टक्के वापर करण्यात आला. रिपोर्टमध्ये सर्वात लोकप्रिय इमोजीसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार माहिती दिली आहे. यामध्ये ‘Smileys and Emotion’, ‘People and body’, ‘Activities’ आणि ‘Flags’ चा समावेश आहे. यात Face-smiling आणि Hands चा सर्वाधिक वापर करण्यात आला. Plants and Flowers इमोजीचा देखील वापर झाला. मात्र, flags कॅटेगरीचा सर्वात कमी वापर केला. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3om7eRc