Full Width(True/False)

ऋता दुर्गुळेचा लवकरच साखरपुडा की आणखी काही? त्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

मुंबई : आघाडीची अभिनेत्री हिने ती दिग्दर्शक याच्यासोबत रिलेशनमध्ये असल्याचे नुकतेच जाहीर केले. तशी पोस्टही ऋताने सोशल मीडियावर शेअर केली होती. ऋताच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. ऋताने प्रतिक सोबत रिलेशनमध्ये असल्याचे जाहीर केल्यानंतर ती अनेकदा दोघांचे रोमँटिक अंदाजातील फोटो शेअर करत असते. लवकरच म्हणजे २५ डिसेंबर रोजी ऋता आणि प्रतिक साखरपुडा करणार आहेत. याचे सूतोवाच खुद्द ऋतानेचे सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. त्यामुळे ऋताच्या चाहत्यांचे लक्ष आता तिच्या साखरपुड्याकडे लागले आहे. ऋताने प्रतिकसोबतचा एक छानसा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, 'मी किती भाग्यवान आहे! त्यासाठी तुझे मनापासून आभार...' असे म्हणत तिने प्रतिक शाहला टॅग केले आहे. ऋताने या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, 'आयुष्यामधील हास्य कधीच संपू नये...अखंड बडबड सुरू रहावी... कारणाशिवाय मैत्री आणि आयुष्यभरासाठी विश्वास आणि प्रेम असावे...हे असे आज आणि कायमसाठी असावे...' ऋताने या पोस्टमधून अनेक गोष्टींचे सूतोवाच केले आहे. परंतु त्याबद्दल तिच्या चाहत्यांना अधिक काही जाणून घेण्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार हे नक्की. ऋताबद्दल सांगायचे तर व्यक्तिगत आयुष्याबद्दल तिने कधीही सोशल मीडियावर पोस्ट केली नाही. तिने प्रतिकसोबतचे रिलेशन देखील गुलदस्त्यात ठेवले. अलिकडेच तिने प्रतिकसोबत असलेले तिचे नात उघड केले आहे. ऋताच्या कामाबद्दल सांगायचे तर छोट्या पडद्यावरील ती अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती 'मन उडू उडू झाले' या मालिकेमध्ये दीपू ची भूमिका साकारत आहे. त्याचप्रमाणे ऋता दादा एक गुड न्यूज आहे, या नाटकातही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तिच्या या नाटकालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तर प्रतिक शाह हा देखील सिनेमा आणि टीव्ही विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत तेरी मेरी एक जिंदरी, बहु बेगम, कुछ रंग प्या के ऐसे भी, मनमोहिनी अशा अनेक मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. प्रतिकची आई मुग्धा शाह ही देखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ऋता दुर्गुळेचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी अभिनेत्री आहे. ऋताच्या या यादीत सहावा क्रमांक आहे. तसेच ऋता ही पहिली अभिनेत्री आहे जिथे इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॅन्सग्रुप आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32b4oWy