Full Width(True/False)

पुन्हा हिंदू धर्माचा अपमान...सनी लिओनीचं नवीन गाणं पाहून नेटकरी भडकले

मुंबई: सनी लिओनीची सोशल मीडियावरची पोस्ट असो, तिची गाणी असोत किंवा आगामी चित्रपट, त्याची चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही. सलग काही वर्षे सर्वाधिक गुगल सर्च झालेली सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. पण सनी सध्या वादात सापडली आहे. हा वाद आहे तिच्या नुकत्याच लॉन्च झालेल्या गाण्याचा. सनीचं ‘’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. गाणं लॉन्च झाल्यानंतर आता वाद सुरू झाला आहे. या गाण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियावर होताना दिसत आहे. या गाण्याला प्रचंड विरोध होताना दिसतोय. काल म्हणजेच २२ डिसेंबर रोजी सनीचं हे गाणं युट्यूबवरून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. प्रसिद्ध गायिका कनिका कपूरनं हे गाणं गायलं असून शरीब आणि तौशी यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. काय होतोय या गाण्याचा विरोध? या गाण्यात हिंदू धर्माची खिल्ली उडवल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर हे अत्यंत वाईट असून या गाण्यामुळं हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3FpixOS