Full Width(True/False)

iPhone: iPhone 14 Pro मॉडेल्समध्ये होणार मोठा बदल, कॅमेरा-रॅम डिटेल्स लीक, ही माहिती समोर

नवी दिल्ली : पुढील वर्षी येणाऱ्या Apple 14 सीरिज बद्दल अहवाल आणि लीक येण्यास सुरुवात झाली असून अलीकडेच समोर आलेल्या अहवालांनुसार, मॉडेल्समध्ये ग्राहकांना पंच-होल डिस्प्लेची झलक मिळू शकते. अनेक अहवालांनी असेही सूचित केले आहे की. नवीन iPhone मॉडेल्स लाइटनिंग पोर्ट ऐवजी यूएसबी टाइप-सी पोर्टसह येतील. पाहा डिटेल्स. वाचा: आतापर्यंत, बाजारात लाँच केलेल्या iPhone मॉडेल्समध्ये १२ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सरच्या पलीकडे प्रगती झालेली नाही. परंतु, MacRumors च्या अहवालानुसार, हा ट्रेंड बदलणार आहे. असे म्हटले जात आहे की, Apple चे iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे मॉडेल ४८-मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह आणले जातील. अहवालानुसार, नवीन प्रो मॉडेल्स ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, ४८ मेगापिक्सेल वाइड लेन्स, १२ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि टेलिफोटो लेन्स देऊ शकतात. या वर्षी एप्रिलमध्ये, असाच दावा TF आंतरराष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी केला होता. ज्यांनी असेही म्हटले होते की iPhone 14 Pro मॉडेल ८ K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतील. याशिवाय, नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये कॅमेरा सेटअपबद्दलच नाही तर रॅमबद्दलही माहिती देण्यात आली आहे. iPhone 13 Pro मॉडेल्समध्ये ६ GB RAM दिसली आहे, परंतु असे म्हटले जात आहे की, कंपनी iPhone 14 Pro मॉडेल ८ GB पर्यंत रॅम वेरिएंटसह लाँच करू शकते. विश्लेषकाच्या मते, स्टोरेजच्या बाबतीत, iphone 14 Pro मॉडेल प्रारंभिक ६४ जीबी स्टोरेज वेरिएंटसह लाँच केले जाऊ शकतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GLF9cs