Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १५ डिसेंबर २०२१: २० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाच प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ अ‍ॅप क्विजच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. अ‍ॅपमध्ये लॉग इन करून यूजर्स यामध्ये भाग घेऊ शकतील. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेता येईल. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १६ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. कोणत्या बेल्जियन-डच रेसिंग ड्रायव्हरने Belgian Grand Prix २०२१ स्पर्धा जिंकली? उत्तर - Max Verstappen २. ऑक्टोबर २०२१ मध्ये पहिल्यांदाच हिमालयन फिल्म फेस्टिव्हलचे कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात आयोजन करण्यात आले होते? उत्तर – लडाख ३. Najla Bouden Romdhane ने या कोणत्या देशाच्या अरब जगतातील पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत? उत्तर – ट्यूनिशिया ४. या देशाचा हाँगकाँगवरील भाडेकरार कोणत्या साली समाप्त झाला आहे? उत्तर – १९९७ ५. हे प्रसिद्ध स्थळ कोणत्या चित्रपट सीरिजमधील आहे? उत्तर - The Hobbit वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3s5MEqF