Full Width(True/False)

Jio Prepaid Plan: जिओने सादर केला खूपच स्वस्त प्लान, दररोज १.५ जीबी डेटासह मिळतील अनेक फायदे

नवी दिल्ली: ने कमी किंमतीचा प्लान सादर केला असून, यामुळे यूजर्सला फायदा होणार आहे. या प्लानमध्ये एसएमएस बेनिफिट्स मिळतील. जिओने काही दिवसांपूर्वी कडे तक्रार केली होती की, Vi कमी किंमतीच्या प्लानमध्ये एसएमएसची सुविधा देत नाहीये. आता जिओने स्वस्त प्लान सादर करत वीआयला टक्कर दिली असून, या प्लानची किंमत ११९ रुपये आहे. या प्लान्समध्ये मिळणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊया. वाचा: Jio चा ११९ रुपयांचा प्लान Reliance Jio च्या ११९ रुपयांच्या प्लानमध्ये १४ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा यानुसार एकूण २१ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतात. तसेच, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळतो. आणि वीआयच्या एसएमएस बेनिफिट्ससह येणाऱ्या प्लानच्या तुलनेत हा प्लान खूपच स्वस्त आहे. Airtel चा सर्वात स्वस्त SMS प्लान एअरटेलच्या एसएमएस बेनिफिट्ससह येणाऱ्या स्वस्त प्लानची किंमत १५५ रुपये आहे. प्लानची वैधता २४ दिवस असून, यात दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतात. यामध्ये प्राइम व्हिडिओ फ्री ट्रायल, फ्री हेलोट्यून्स आणि विंक म्यूझिकची मेंबरशिप मिळते. Vodafone-Idea चा सर्वात स्वस्त SMS प्लान Vodafone-Idea च्या एसएमएस बेनिफिट्ससह येणाऱ्या स्वस्त प्लानची किंमत १७९ रुपये आहे. प्लानची वैधता २८ दिवस असून, यात दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतात. तसेच, मूव्हीज आणि टीव्हीची मेंबरशिप मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pTDFGi