Full Width(True/False)

Flipkart sale: Realme च्या ५जी स्मार्टफोनवर मिळतेय २० हजार रुपयांची सूट, ऑफरचा शेवटचा दिवस

नवी दिल्ली : तुम्ही जर नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वर सेल सुरू आहे. या सेलमध्ये रियलमीचे स्मार्टफोन्स खूपच स्वस्तात मिळत आहे. सेलमध्ये स्मार्टफोनवर २० हजार रुपये डिस्काउंटसह उपलब्ध आहे. वाचा: सेलमध्ये GT Neo 2 या ५जी स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. ३४,९९९ रुपये मूळ किंमत असलेला हा फोन ८ टक्के डिस्काउंटनंतर ३१,९९९ रुपयात उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ५ टक्के म्हणजेच १,६०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. याप्रमाणे ३१,९९९ रुपयांचा फोन ३०,३९९ रुपयात उपलब्ध होईल. फ्लिपकार्ट सेलमध्ये एक्सचेंज ऑफर देखील मिळते. जुन्या फोनवर १५,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळतो. ही ऑफर जुन्या फोनच्या कंडिशन आणि मॉडेलवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास ३०,३९९ रुपयांवरून किंमत १४,९४९ रुपयांवर येईल. याप्रमाणे फोनवर एकूण २०,०५० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा लाभ मिळेल. Realme GT Neo 2 चे फीचर्स Realme च्या या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. यात क्वालकॉन स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये ६.६३ इंच फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले मिळाला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस मिळते. सेल्फीसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळते. दरम्यान, फेस्टिव्ह डेज सेलचा आज अखेरचा दिवस असून, कमी किंमतीत फोन खरेदीची ही शेवटची संधी आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3m2olWL