Full Width(True/False)

Jio Vs Airtel Vs Vi: कोणत्या कंपनीचा २९९ रुपयांचा प्लान आहे बेस्ट, कोण देतंय अधिक फायदे,पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : Jio, Airtel आणि Vi ने गेल्या महिन्यात टॅरिफ प्लानच्या किंमती २० ते २५ टक्क्यांनी वाढवल्या होत्या. आता तिन्ही कंपन्यांचे सर्व प्रीपेड प्लान नवीन किमतींसह लिस्ट आहेत, ज्यामध्ये हाय स्पीड डेटा, OTT अॅप्स आणि अनलिमिटेड कॉलिंग दिले जात आहे. आज आम्ही तुम्हाला या तिन्ही कंपन्यांच्या २९९ रुपयांच्या प्लानची तुलना करून सांगणार आहोत की कोणाच्या प्लानमध्ये किती फायदे मिळतील. जाणून घेऊया. वाचा: Jio चा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लान : जिओच्या या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्रीपेड प्लानमध्ये दररोज २ GB डेटा आणि १०० मेसेजेस ऑफर केले जातात. यासोबतच यूजर्सना यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. याशिवाय, रिचार्ज पॅकमध्ये Jio TV, Movies, Security आणि Cloud चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाईल. Airtel चा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लान: Airtel च्या या प्रीपेड पॅकमध्ये दररोज १ GB डेटा आणि १०० मेसेजेस मिळतात. युजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. यासोबतच, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, फ्री हॅलो ट्यून आणि विंक म्युझिकचे सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये दिले जाईल. त्याच वेळी, या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. Vi चा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लान: Vodafone Idea चा हा प्रीपेड प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्रीपेड पॅकमध्ये Vi Movies, Live TV, Weekend Data Rollover आणि Binge All Night प्रदान केले आहेत. यासोबतच Vi च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १.५ GB डेटा आणि १०० मेसेजेस मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dv0qdR