मुंबई: १३ चा आगामी भाग एकदम स्पेशल आहे. या भागामध्ये प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेची म्हणजेच 'तारक मेहता का उलटा चश्मा'ची टीम या एपिसोडमध्ये दिसणार आहे. मालिकेली एक दोन कलाकार नव्हे तर संपूर्ण टीम केबीसीच्या मंचावर हजेरी लावणार आहे. या एपिसोडचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. गोकुळधाममधला जेठालाल, गरबाक्वीन दयाबेन, कडक शिस्तीचे भिडे मास्तर, 'दुनिया हिला दूंगा' म्हणणारा पत्रकार पोपटलाल, खोडकर टप्पू, अय्यर, डॉ. हाथी, सोढी ही सगळी पात्रं आज प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग बनली आहेत. ही सर्व मंडळी अमिताभ यांच्या बच्चन यांच्यासोबत केबीसीच्या मंचावर धम्माल करताना दिसणार आहे. तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेतील सर्व २२ कलाकार या स्पशेल एपिसोडमध्ये उपस्थित असणार आहेत .जेठालाल अर्थात दिलीप जोशी, बापूजी (अमित भट्ट), पोपटलाल (श्याम पाठक) आणि निर्माते असित कुमार मोदी शोमध्ये पोहोचले. तिघेही शोमध्ये गेम खेळणार आहेत आणि उर्वरित शोमध्ये प्रेक्षक म्हणून बसणार
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DpMaOa