मुंबई- '' छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त लोकप्रिय कार्यक्रम ठरला आहे. 'बिग बॉस मराठी ३' चा टीआरपी सध्या उंचावत आहे. घरात होणारी भांडणं आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सुरू असलेली सदस्यांची धडपड पाहून प्रेक्षकही कार्यक्रमात गुंतत आहेत. या आठवड्यात भरलेल्या बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर सगळ्याचं सदस्यांना खडे बोल सुनावताना दिसले. मीरा आणि जय यांचा मांजरेकरांनी चांगलाच समाचार घेतला. मात्र हिला आलेल्या चुगलीमुळे मात्र तोंडघशी पडताना दिसला. गायत्री हिने टीम ए सोडून टीम बी सोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम ए चे सदस्य कमी झाले आहेत. त्यात रविवारी गायत्रीला आलेल्या चुगलीमुळे जयचा खोटेपणा सगळ्यांसमोर उघडं होतो. गायत्रीचा चाहता तिला चुगली सांगतो की, जय उत्कर्ष आणि मीराला सांगत होता की गायत्रीपेक्षा विशालवर इन्वेस्टमेण्ट केली असती तर तो आपल्यासाठी खेळला असता.' ही चुगली ऐकून गायत्री खूप दुखावली जाते. बाहेर येऊन गायत्री जयला म्हणते, धन्यवाद जय. ज्या व्यक्तीबद्दल कायम चांगलं बोलले, चांगला विचार केला त्याने माझ्याबद्दल असा विचार केला. माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला.' गायत्रीला आलेल्या या चुगलीवर जयने कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. यासंपूर्ण प्रकारामुळे जय सगळ्यांसमोर तोंडघशी पडला आहे. सोशल मीडियावरही नेटकरी जयला ट्रोल करत आहेत. तर गायत्रीला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3GgRkOs