मुंबई- अभिनेत्री नेहमीच यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करताना दिसते. सईच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेलाय. सईला च्या Best of 2021 च्या यादीत मानाचं स्थान मिळालं आहे. (IMDB) ने नुकतीच Top 10 Breakout stars of Indian films and web series 2021 ची लिस्ट जाहीर केली. या यादीमध्ये IMDB ने सईचा उल्लेख केला. सईने यंदा समांतर, नवरसा आणि मीमी या तीन वेगवेगळ्या भाषांच्या कलकृतींमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांव्दारे रसिकांच्या मनावर आपली अमीट छाप सोडली. IMDB ने याची दखल घेत सईला ‘ब्रेकआउट स्टार’ म्हटलं. या सन्मानाविषयी अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली की, 'आयएमडीबी हा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. कलाकृतीला भाषेचं बंधन न लावता, त्याकडे पाहण्याचा विस्तीर्ण दृष्टिकोण ग्लोबल सिनेमाचा आणि वेबसीरिजचा असतो. अशा ठिकाणी माझ्या कामाचा गौरव होणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आयएमडीबी सारख्या प्रतिथयश प्लॅटफॉर्मने आपल्या कामाचा असा गौरव करावा ही आनंदाचीच गोष्ट आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xT6ZQK