Full Width(True/False)

Netflix: आता प्रत्येकाला परवडणार नेटफ्लिक्स, कंपनीने ३०० रुपयांपर्यंत कमी केली प्लान्सची किंमत

नवी दिल्ली : आजपासून मेंबरशिपसाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. मात्र, दुसरीकडे ने आपल्या ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले असून, कंपनीने भारतातील आपले प्लान्स स्वस्त केले आहे. आता बेसिक प्लानची सुरुवाती किंमत १४९ रुपये आहे. याआधी मोबाइल ओनली प्लानची किंमत १९९ रुपये प्रती महिना होती. नेटफ्लिक्सच्या या निर्णयामुळे सबस्क्राइबर्स वाढण्याची शक्यता आहे. वाचा: Netflix च्या मासिक प्लानची किंमत ४९९ रुपये होती. यात मोठी कपात करण्यात आली असून, यूजर्सला आता ४९९ रुपयांच्या प्लानसाठी केवळ १९९ रुपये खर्च करावे लागतील. नेटफ्लिक्सच्या स्टँडर्ड प्लानची किंमत देखील कमी झाली आहे. याची किंमत ४९९ रुपये झाली असून, आधी यासाठी ६४९ रुपये मोजावे लागत असे. प्रीमियम प्लानची किंमत ७९९ रुपये होती. मात्र, आता महिन्याला ६४९ रुपये खर्च करावे लागतील. नवीन किंमती लागू झाल्याने Netflix चा मोबाइल प्लान १४९ रुपये प्रती महिना आहे. हा प्लान मोबाइल आणि टॅबलेटला सपोर्ट करतो. याचे रिझॉल्यूशन ४८०पी आहे. प्लानमध्ये नेटप्लिक्सला टीव्ही अथवा कॉम्प्युटरवर अ‍ॅक्सेस करता येणार नाही. यात अकाउंटला एकावेळी एकाच डिव्हाइसवर अ‍ॅक्सेस करता येईल. बेसिक प्लानची किंमत आता १९९ रुपये झाली आहे. यात देखील ४८०पी रिझॉल्यूशन सपोर्ट मिळतो. अकाउंटला टीव्ही अथवा कॉम्प्युटरवर अ‍ॅक्सेस करू शकता. मात्र, एकावेळी एकाच डिव्हाइसमध्ये पाहता येईल. Netflix च्या ४९९ रुपयांच्या स्टँडर्ड प्लानमध्ये एकावेळी दोन डिव्हाइस वापरू शकता. याचे रिझॉल्यूशन १०८०पी आहे. अकाउंटला मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटर आणि टॅबलेटवर अ‍ॅक्सेस करता येईल. Netflix च्या प्रती महिना ६४९ रुपयांच्या प्रीमियम प्लानमध्ये ४के रिझॉल्यूशन सपोर्ट मिळतो. प्लानमध्ये ४ डिव्हाइस एकाचवेळी सपोर्ट करतात. अकाउंटला मोबाइल, टॅबलेट, कॉम्प्युटर आणि टीव्हीवर अ‍ॅक्सेस करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DUcnon