Full Width(True/False)

Prepaid Recharge Plans: एकदाच रिचार्ज करा आणि वर्षभर टेंशन मुक्त रहा, महिन्याचा खर्च १५० रुपयांपेक्षा कमी

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या , आणि वोडाफोन आयडियाने काही दिवसांपूर्वीच रिचार्ज प्लान्सचे दर वाढवले आहे. जिओचे प्लान ७०० रुपयांपर्यंत महाग झाले आहे. एअरटेल आणि वीआयचे रिचार्ज देखील २५ टक्के महाग झाले आहेत. वाचा: , एअरटेल आणि वीआयचे काही रिचार्ज प्लान स्वस्त असून, एकदाच रिचार्ज करून तुम्ही शेकडो रुपये वाचवू शकता. या प्लानमध्ये तुम्हाला महिन्याला १५० रुपयांपेक्षा कमी खर्च येईल. या प्लान्सविषयी जाणून घेऊया. जिओचा १,५५९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओकडे १,५५९ रुपयांचा प्लान आहे. या प्लानची वैधता ३३५ दिवस आहे. म्हणजेच, महिन्याला तुम्हाला १४१.७ रुपये खर्च येईल. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, २४ जीबी डेटा आणि ३६०० एसएमएस मिळतात. प्लानमध्ये जिओ अ‍ॅप्सचे देखील मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. एअरटेलचा १,७९९ रुपयांचा प्लान एअरटेलकडे १,७९९ रुपयांचा एक अनलिमिटेड प्लान आहे. एअरटेलच्या या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. एअरटेलच्या या प्लानमध्ये महिन्याला १४९ रुपये खर्च येतो. या प्लानमध्ये २४ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० एसएमएस मिळतात. वोडाफोन आयडियाचा १,७९९ रुपयांचा प्लान वीआयच्या १,७९९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. या प्लानमध्ये देखील एकूण २४ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३,६०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, Vi Movies & TV बेसिक अ‍ॅक्सेस मिळतो. BSNL चा १,४९९ रुपयांचा प्लान BSNL च्या १,४९९ रुपयांच्या प्लानमध्ये देखील वर्षभराची वैधता मिळते. प्लानमध्ये महिन्याचा खर्च १२४ रुपये येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, एकूण २४ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3IJ8u9v