नवी दिल्ली: आजच्या डिजिटल युगात हे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. सरकारी फॉर्मपासून ते बँकेत खाते उघडण्यापर्यंत सर्वत्र याचा वापर केला जातो. यासोबतच तुमची अनेक महत्त्वाची माहिती या छोट्या कार्ड सोबत जोडलेली असते. अशा परिस्थितीत, कोणतीही व्यक्ती तुमच्या पॅन कार्डद्वारे तुमची सर्व वैयक्तिक माहिती सहजपणे काढू शकते. वाचा: पॅन कार्डद्वारे, तृतीय व्यक्ती तुमचा पत्ता, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक देखील जाणून घेऊ शकते. यामुळे तुम्ही अनेक वेळा ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू शकता. पण, यावर उपाय स्वरूप म्हणून काही गोष्टींचा वापर करून तुम्ही या सर्व फसवणूक आणि चोरीपासून सहज सुरक्षित राहू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या उपायांबद्दल सांगणार आहोत. जाणून घेऊया. अनोळखी व्यक्तींना महत्त्वाचे डिटेल्स सांगू नका: बर्याच वेळा तुम्ही तुमच्या पॅनकार्डबद्दल सर्वांना सांगता, जे बरोबर नाही. तुम्हाला पॅन कार्डची फसवणूक आणि चोरी टाळायची असेल, तर तुमच Pan Card किंवा त्याचा नंबर कोणाशीही शेअर करू नका. अनेक वेळा आपण पॅन कार्डची Xerox घेण्यासाठी दुकानात जातो, त्यामुळे अनेक वेळा मूळ पॅन कार्ड तिथेच विसरतो, त्यामुळे समस्याही उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, Xerox करताना मूळ प्रत आणण्यास विसरू नका. सिबिल स्कोअर तपासत रहा: एकदा पॅन कार्ड तयार झाल्यानंतर, तुम्ही नेहमी त्याची फोटो कॉपी तुमच्याजवळ ठेवावी. त्याची डिजिटल प्रिंटही अनेक ठिकाणी स्वीकारली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही मूळ पॅन कार्ड तुमच्या घरी आरामात ठेवणे फार महत्वाचे आहे. तसेच, तुमच्या कार्डचा सिव्हिल स्कोअर तपासत राहा. सिबिल अर्थात क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेडचा स्कोअर खूप महत्त्वाचा आहे. ही ३०० आणि ९०० मधील ३ अंकी संख्या असते. संख्या ३०० असल्यास सिव्हिल स्कोअर खराब मानला जातो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Ik1yzg