Full Width(True/False)

Moto G31 :३६ तासांच्या बॅटरी बॅकअपसह येणाऱ्या Moto G31 चा पहिला सेल आज, असा मिळवा डिस्काउंट

नवी दिल्ली: पहिल्या सेलसाठी आज म्हणजेच ६ डिसेंबर रोजी उपलब्ध होणार आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार असून हा ८.४५ mm जाडीचा हलका स्मार्टफोन आहे. फोन वक्र डिझाइनमध्ये येईल. कंपनीकडून हँडसेटवर एक वर्षाची व अॅक्सेसरीजवर ६ महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. तसेच, मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनची स्पेस 1 TB पर्यंत वाढवता येते. वाचा: Moto G31 : किंमत आणि ऑफर Moto G31 स्मार्टफोनच्या ४ GB रॅम आणि ६४ GB व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १४,९९९ रुपयांना मिळेल. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर फोन खरेदी केल्यास ५ टक्के सूट दिली जात आहे. तर, कॅनरा बँक क्रेडिट कार्डवर १० टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. हीच १० % सूट ICICI बँक मास्टरकार्डवर देखील दिली जात आहे. तसेच, फोन ४५१ रुपये प्रति महिना EMI वर खरेदी केला जाऊ शकतो. Moto G31: स्पेसिफिकेशन्स Moto G31 स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा AMOLED फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. त्याची स्क्रीन ब्राइटनेस ७०० nits आणि दोलायमान रंग आहे आणि कॉन्ट्रास्ट 409 PPI आहे. Moto G31 मध्ये प्रोसेसर म्हणून फोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट सपोर्ट करण्यात आला आहे. फोनमध्ये ARM Mali-G52 MC2 सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Android ११ आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. Moto G31 स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात प्राथमिक कॅमेरा म्हणून ५० MP सेन्सर आहे. याशिवाय ८ MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, २ MP डेप्थ कॅमेरा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनच्या समोर १३ MP कॅमेरा देण्यात आला आहे. Moto G31 स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये ५००० mAh बॅटरी उपलब्ध असेल. २० W फास्ट चार्जरच्या मदतीने Device चार्ज करता येते. कंपनीचा दावा आहे की, फोन एका चार्जवर ३६ तासांची बॅटरी लाईफ देतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3InLIni