नवी दिल्ली: आयकर विभागाकडून जारी केले जाते, ज्यांचे मुख्य काम ५० हजारांवरील व्यवहारादरम्यान असते. पॅन कार्डवर १० अंकी क्रमांक लिहिलेला असतो. ज्याला, पॅन क्रमांक म्हणतात. यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती असते. परंतु, पॅन कार्डच्या वाढत्या वापरामुळे ते हरविण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. अनेकदा लोकांना पॅन कार्डची हार्ड कॉपी अनेक ठिकाणी घेऊन जावे लागते. परंतु, त्याची भौतिक प्रत सर्वत्र नेण्यात ती हरवण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत ई-पॅन कार्डचा कल झपाट्याने वाढला आहे. ही तुमच्या मूळ पॅन कार्डची आभासी प्रत आहे. E-Pan-Card सर्वत्र स्वीकारले जाते. जाणून घेऊया ई-पॅन कार्डचे फायदे. वाचा: हरविण्याची भीती नाही: अनेक वेळा लोकांचे मूळ पॅन कार्ड हरविते. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकजण झेरॉक्सच्या दुकानात, बँकेत किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये विसरतात. अनेकजण पर्स किंवा वॉलेटमध्ये मध्ये पॅनकार्ड ठेवतात. अशात पर्स किंवा वॉलेट चोरीला गेल्यास पॅनकार्डही चोरी जाते. त्यामुळे, ई-पॅन कार्ड वापरणे चांगले आहे. तुम्ही त्याची सॉफ्ट कॉपी तुमच्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये ठेवू शकता. जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कुठेही वापरू शकता. मूळ पॅन कार्डपेक्षा अधिक सोयीस्कर: ई-पॅन कार्ड तुमच्या हार्डकॉपी मूळ पॅन कार्डपेक्षा अधिक सोयीस्कर आहे. तुम्ही ते कधीही आणि कुठेही वापरू शकता. तुम्ही तुमच्या कागदपत्रांसह ई-पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्हाला ते स्कॅन किंवा फोटोकॉपी करण्याची गरज नाही. स्टोरेज: पॅन कार्डची हार्डकॉपी बॅग, पर्स किंवा इतर कोणत्याही सुरक्षित ठिकाणी ठेवणे कधी -कधी अवघड जाते. अशात, ई-पॅन कार्ड वापरून, तुमची या सर्व समस्यांपासून सुटका मिळवू शकता. कारण, तुम्हाला ते तुमच्या बॅगेत किंवा पर्समध्ये ठेवावे लागत नाही. डाउनलोड करू शकता: तुम्ही तुमचे ई पॅन कार्ड तुमच्या फोन किंवा लॅपटॉपमधून कोठूनही नेट वापरून सहजपणे डाउनलोड करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DydRV3