नवी दिल्ली : Xiaomi ने गेल्या आठवड्यात आपला नवीन फोन भारतीय बाजारात लाँच केला असून आज,७ डिसेंबरला या फोनची पहिली विक्री होणार आहे. ग्राहक दुपारी १२ वाजता Amazon India आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतील. फोनमध्ये ९० Hz डिस्प्ले, ड्युअल रियर कॅमेरे आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्याची थेट स्पर्धा Realme 8s 5G, iQoo Z3 आणि Lava Agni 5G सारख्या डिव्हाइसेस सोबत आहे. पाहा डिटेल्स. वाचा: Redmi Note 11T 5G: किंमत आणि ऑफर हा स्मार्टफोन तीन प्रकारात आणण्यात आला आहे. Redmi Note 11T 5G स्मार्टफोनची किंमत ६ GB RAM + ६४ GB स्टोरेज वेरिएंटसाठी १६९९९ रुपये, ६GB RAM + १२८ GB स्टोरेज वेरिएंटसाठी रुपये १७,९९९ आणि ८ GB RAM + १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी रुपये १९,९९९ आहे. लाँच ऑफर अंतर्गत कंपनी फोनवर १,००० रुपयांची सूट देत आहे. जे ग्राहक ICICI बँक क्रेडिट कार्ड किंवा EMI व्यवहार करून फोन विकत घेतील त्यांना १००० रुपयांची इन्स्टंट सूट देखील मिळू शकते. म्हणजेच, दोन्ही ऑफर एकत्र करून, तुम्ही हा फोन १४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत घेऊ शकाल. Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन्स : Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये ६.६ -इंचाचा फुल-एचडी + १०८०x२४०० पिक्सेल डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो २०: ९ आहे आणि अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट ९० Hz आहे. डिस्प्लेवर संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आहे. हे डिव्हाइस ८ 8GB पर्यंत RAM आणि १२८ GB पर्यंत स्टोरेजसह ऑक्टा-कोर MediaTek Dimensity ८१० प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. याला RAM बूस्टर वैशिष्ट्य देखील मिळते, जे इंटर्नल स्टोरेज वापरून ३ GB पर्यंत अतिरिक्त रॅम जोडते. Redmi Note 11T 5G स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात ५० मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आणि ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात ५,००० mAh बॅटरी आहे, जी ३३ W प्रो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर बॅटरी दोन दिवस वापरता येईल, असा कंपनीचा दावा आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lECZmM